घरलाईफस्टाईलपुदीना-तुळशीची पाने स्टोअर करण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा

पुदीना-तुळशीची पाने स्टोअर करण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरा

Subscribe

किचनमध्ये वापरले जाणारे असे काही हर्ब्स असतात जे केवळ खाल्ल्याने चव अधिक वाढली जातेच पण आरोग्यासाठी सुद्धा यामुळे फायदे होतात. अशातच दोन हर्ब्स म्हणजे पुदीना आणि तुळस. बहुतांश महिला या दोन्ही गोष्टींचा वापर करुन आरोग्यासंबंधित समस्या दूर करू शकता. मात्र ते नक्की स्टोअर कसे करायचे हे बहुतांश महिलांना माहिती नसते. अशातच त्याची पानं लवकर खराब होऊ लागतात. अशातच पुदीना-तुळशीची पाने स्टोअर करुन ठेवायची असतील तर पुढील ट्रिक्स नक्कीच तुमच्या कामी येतील.

तुळशीची पानं अशी करा स्टोर 
तुळशीची पानं लवकर खराब होत असतील तर ती व्यवस्थितीत स्टोअर करण्यासाठी स्वच्छ आणि सुकलेल्या ठिकाणी ठेवा. जेथे पाणी पडणार नाही. जेव्हा तुळशीच्या पानातील ओलसरपणा दूर होईल तेव्हा ते देठापासून दूर करत टिश्यूपेपर घेऊन फ्रिजरमध्ये ठेवा. तुळशीची पाने खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही ती अन्य भाज्यांसोबत ठेवू नका.

- Advertisement -

पुदीन्याची पानं अशी करा स्टोर


पुदीन्याच्या पानातील ओलरसपणा निघून गेल्यानंतर ती हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही पुदीना स्टोर करण्यासाठी तुम्ही दुसरी ट्रिक ही वापरू शकता. यासाठी पुदीन्याची पानं स्वच्छ धुवून सुकवून घ्या. त्यानंतर पेपर टॉवेल किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. असे केल्याने पुदीना काही आठवड्यापर्यंत फ्रेश राहू शकतो. त्याचसोबत प्लास्टिक बॅगचा सुद्धा वापर करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा- कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले पाहिजेत?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -