Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthHealth Tips : मुलांची उंची वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ उपयुक्त

Health Tips : मुलांची उंची वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ उपयुक्त

Subscribe

मुलांच्या शारीरिक विकासासाठी काय आवश्यक आहे तर, निरोगी अन्न, मुलाच्या चांगल्या उंचीसाठी त्याच्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते, पण काही वेळा आरोग्यदायी पदार्थ खाऊनही मुलांच्या उंचीची वाढ होत नाही. मुलाची उंची देखील त्यांच्या पालकांच्या उंचीवर अवलंबून असते. पण जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या कमी उंचीची काळजी वाटत असेल, तर तुम्ही त्याच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, जे खाल्ल्याने मुलांची उंची वाढू शकते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

मुलांची उंची वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना दूध, दही, चीज इत्यादी पदार्थ देऊ शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम देखील आढळतात, ज्यामुळे मुलाच्या वाढीस मदत होते. मुलांना दिवसातून 1 ते 2 ग्लास दुध द्यावे.

- Advertisement -

अंडी

अंडी हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन बी2 आढळते. जे मुलाची उंची वाढवण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करा. त्यामुळे उंची वाढण्यास मदत होईल. म्हणून मुलांच्या रोजच्या जेवणात अंडयांचा समावेश करावा. अंड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना देता येतील.

फळं

मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांना आहारात फळेही खायला द्यावीत. फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. जर मुलाची उंची वाढण्याच्या टप्प्यात असेल तर त्याला दिवसातून किमान दोनदा फळे किंवा ज्यूस द्यावा.

- Advertisement -

हिरव्या भाज्या

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम हिरव्या भाज्यांमध्ये आढळते. या सर्व गोष्टींची उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना सॅलड, सूप आणि इतर पौष्टिक आहार द्यावा. यामुळे मुलांची वाढ होण्यास मदत होईल. जर लहान मुलांना भाज्या आवडत नसतील तर त्या बनवताना त्यात लहान मुलांना आवडेल असा ट्विस्ट देऊन त्यांना चविष्ट करण्याचा प्रयत्न करा.

सोयाबीन

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये असलेले पोषक तत्व हाडे मजबूत करतात. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या मुलाच्या आहारात सोयाबीनच्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करू शकता.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स देखील प्रथिने, निरोगी चरबी आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतात. या सर्व गोष्टी मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे मुलांना काजू, बदाम, मनुके खायला द्यावेत.

मुलांची उंची वाढवण्याचे आणखी काही उपाय

  • मुलांना नियमित व्यायाम करायला लावा.
  • उंची वाढवण्यासाठी मुलांना पुरेशी झोप घेऊ द्या.
  • मुलांच्या वाढीसाठी त्यांना तणावापासून दूर ठेवा.
  • मुलांना निरोगी जीवनशैली द्या.
- Advertisment -

Manini