घरमनोरंजननॅशनल अवॉर्ड पटाकवलेल्या तब्बूच्या 'चांदनी बार'चा येणार सीक्वेल

नॅशनल अवॉर्ड पटाकवलेल्या तब्बूच्या ‘चांदनी बार’चा येणार सीक्वेल

Subscribe

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट निर्माते जुन्या चित्रपटांचा सीक्वेल तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. या यादीत आता अभिनेत्री तब्बूच्या 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या चांदनी बारचा देखील समावेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी केले होते. मात्र, चित्रपटाच्या नव्या सीक्वेलचे दिग्दर्शन कमान मोहन आझाद करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

चित्रपटाच्या सीक्वेलबाबत दिग्दर्शकांचं मत

बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन आझाद म्हणाले की, “या चित्रपटाच्या सीक्वेलची कथा दहा वर्ष आधीच ठरवली होती. परंतु आमचे निर्माते सीक्वेल बनवण्याच्या तयारीत नव्हते. पण आता लवकरच यावर काम सुरु होईल.”

- Advertisement -

हे कलाकारही होते मुख्य भूमिकेत

‘चांदनी बार’ मध्ये तब्बूसोबत अभिनेता अतुल कुलकर्णी, राजपाल यादव, मिनाक्षी साहनी, अनन्या खरे आणि विशाल ठक्कर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटाने पटकावले होते नॅशनल अवॉर्ड

- Advertisement -

तब्बूच्या ‘चांदनी बार’ चित्रपटाला 4 नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. तब्बूने या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. तसेच अभिनेता अतुल कुलकर्णीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता तसेच अभिनेत्री अनन्या खरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देखील मिळाला होता.


हेही वाचा : दुबईमध्ये प्रियंकाचा फॅमिली टाईम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -