घरमहाराष्ट्रThackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच...

Thackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच दिवसांनंतर देशाने पाहिला – उद्धव ठाकरे

Subscribe

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल चंद्रपूरमध्ये सभा झाली. यावेळी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना संबोधले. पंतप्रधानांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा असा वाईट योग बऱ्याच वर्षानंतर देशाने पाहिला. पंतप्रधान हे देशाचे असतात मात्र नरेंद्र मोदी हे एका भेकड, भाकड आणि भ्रष्ट पक्षाचे नेते आहेत. काल झालेले भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नेत्याचे भाषण होते, अशी टीका ठाकरेंनी केली.

- Advertisement -

भेकड, भाकड आणि भ्रष्ट जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी

उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे असतात मात्र नरेंद्र मोदी हे भाकड जनता पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही जी टीका-टिप्पणी करतो ती पंतप्रधान पदावर करत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. पंतप्रधान पद हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने देशाचा विचार करायचा असतो. मात्र नरेंद्र मोदी हे एका भेकड पक्षाचे नेते आहेत. आमची टीका ही त्यांच्यावर असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र मोदी हे भेकड पक्षाचे नेते यासाठी आहेत, कारण ते शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांना फसवत आहेत. त्यांच्यावर विविध यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे काल जे भाषण झाले ते भेकड जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदींचे भाषण होते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
भाकड जनात पक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे आता एनडीए आघाडी राहिलेली नाही. एनडीए आघाडीतील प्रमुख पक्ष हे त्यांना सोडून गेले आहेत. त्यात शिवसेना आणि अकाली दल यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आता एनडीए ही ठिगळांची आघाडी आहे. विविध ठिगळं लावून ही आघाडी चालवली जात आहे. नेत्यांना यंत्रणांचा धाक दाखवायचा आणि आपल्यासोबत घ्यायचे, अशी ही भाकड जनता पक्षाची आघाडी असल्याचे शरसंधान त्यांनी नरेंद्र मोदींवर केले.

- Advertisement -

भाजप पक्षाला आता भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष झालेल आहे. त्या पक्षाकडे कोणताही आदर्श राहिलेला नाही, जरी ‘आदर्श’ अशोक चव्हाण तिकडे गेलेल असले तरी, त्या पक्षाकडे कोणताच आदर्श नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अशोक चव्हाणांना लगावला.

शिवसेनाही गुजरातला पळवायची होती – उद्धव ठाकरे

भाजप खंडणीखोर लोकांचा पक्ष असल्याची जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ते म्हणाले की, भाजप हा खंडणीखोरांचा पक्ष आहे. ‘चंदा दो धंदा लो’ असे धोरण या पक्षाचे आहे, असा टोला त्यांनी इलेक्ट्रोल बॉण्डवरुन भाजवर केला. इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून भाजपने बड्या उद्योगपतींचा फायदा करुन दिला आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते म्हणाले की, पूर्वी मारुती कार खरेदी करणाऱ्याला कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि खंडणी मागितली जायची. तसेच आता भाजपकडून सुरु आहे. उद्योगपतींकडून इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून खंडणी वसूल केली जात आहे.
खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यानी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचे कारण नाही. त्यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती, मात्र मी ती पळवू दिली नाही. त्याचा राग त्यांना आहे, असा टोलाही ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला.

हेही वाचा : MVA LIVE : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला! सांगली ठाकरे तर भिवंडी शरद पवारांकडेच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -