Sunday, June 4, 2023
घर मानिनी Diary अफगाणिस्तानच्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या मरिना गुलबहारी आंतरराष्ट्रीय स्टारची कहानी

अफगाणिस्तानच्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या मरिना गुलबहारी आंतरराष्ट्रीय स्टारची कहानी

Subscribe

मरिनाने डोके न झाकता तिथे चित्र काढले. त्यामुळे संतापलेल्या तालिबान्यांनी मरिनाला ठार मारण्याचा फतवा काढला. ही गोष्ट २०१५ ची आहे. या फतवा निघाल्यानंतर मरिना तिच्या घरी परतलीच नाही. दक्षिण कोरियाहून ती फ्रान्सला गेली आणि तिथल्या  रिफ्यूजी कॅम्पमध्ये आश्रय घेतला.

आंतरराष्ट्रीय स्टार मरिना गुलबहारी (Marina Golbahari) ही जितकी सुंदर आहे. तितकेच मरिनाच्या आयुष्याची कहानी ही भयानक आहे. विश्वास ठेवणे कठीण आहे. पण, एका फोटोने अभिनेत्रीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. यामुळे मरिनाला आपले घर, शहर आणि देश सोडावे लागले आणि आज ती रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहवे लागले.

मरिना गुलबहारी ही अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अभिनेत्री आहे. २००१ मध्ये, जेव्हा अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सिनेमा बून लागेल होते. तेव्हा मरीना फक्त १२ वर्षांची होती आणि तिथल्या रस्त्यावर भीक मागताना एका दिग्दर्शकाने पाहिले आणि आपल्या सिनेमात घेतले. या सिनेमाचे नाव ओसामा, असे होते. या चित्रपटातून ती आंतरराष्ट्रीय स्टार झाली.

- Advertisement -

दरम्यान, एका सिनेम महोत्सवात सहभागी होण्यासाठी मरिना ही दक्षिण कोरियाला गेली होती. तेव्हा मरिनाने डोके न झाकता तिथे चित्र काढले. त्यामुळे संतापलेल्या तालिबान्यांनी मरिनाला ठार मारण्याचा फतवा काढला. ही गोष्ट २०१५ ची आहे. या फतवा निघाल्यानंतर मरिना तिच्या घरी परतलीच नाही. दक्षिण कोरियाहून ती फ्रान्सला गेली आणि तिथल्या  रिफ्यूजी कॅम्पमध्ये आश्रय घेतला. तेव्हापासून मरिना फ्रान्समध्ये रिफ्यूजीमध्ये राहते.

- Advertisement -

मरिनाचा जन्म गरीब कुटुंबात झाला

मरिना गुलबहारी यांचा जन्म १९८९ मध्ये अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये झाला. वडील उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर सामान विकायचे, तिच्या वडिलांवर ७ मुले आणि पत्नीची जबाबदारी होती. संपूर्ण कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. वडिलांच्या कमाईने घर चालवणे कठीण झाले होते. यामुळे ते मुलांनासोबत घेऊन रस्त्यावर भीक मागायला घेऊन जात असे.

अफगाणिस्तानातील सर्व सिनेमागृहे उद्ध्वस्त झाली आणि रस्त्यांवर लावलेले टीव्ही आणि रेस्टॉरंट्सही नष्ट करण्यात आले. काही सिनेमा निर्मात्यांनी अफगाणिस्तान सोडले, तर अनेक सिनेमा निर्मात्यांनी एकतर त्यांचे रील जमिनीत गाडले किंवा त्यांचे सिनेमा वाचवण्यासाठी त्यांनी कॅमेरा बंद केला.

२००१ मध्ये अमेरिकेने तालिबानवर केलेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्थानात सिनेमा पुन्हा हळूहळू सुरू झाला. अफगाणिस्तानवर आधारित सिनेमा बनवायचा होता. यासाठी इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबाफ यांनी कंदाहार हा सिनेमा बनवला, जो कान्सला जाणारा पहिला अफगाणी सिनेमा ठरला असून तेव्हापासून अफगाणिस्तानात काही मोजकेच सिनेमा निर्मातेही सिनेमा बनवू लागले.

निर्माता सिद्दीक बर्मक हे पहिले निर्माते होते, ज्यांनी आपला पहिला सिनेमा ओसामा (२००३) बनवण्याचा निर्णय घेतला. ज्याचे शूटिंग अफगाणिस्तानातच झाले होते. या सिनेमासाठी त्यांना एका अभिनेत्रीची गरज होती. मात्र, तालिबानच्या कडक नियमांमुळे एकाही महिलेने सिनेमात काम करण्यास तयार नव्हती.

सिनेमात काम करायला मी काफिर नाही – मरिना

एके दिवशी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर फिरत असताना सिद्दिक बर्माक यांना मरिना ही रस्त्यावर भीक मागताना पाहिली. त्यावेळी मरीना फक्त १२ वर्षांची होती. बर्माकने मरिनाला सिनेमात काम करणार का?, असे स्पष्ट विचारले. या प्रश्नावर मरिना घाबरली. तिने पुढे उत्तर दिले, ‘नाही, मी काफिर नाही. सिनेमात काम करणार नाही.

मरिना ही १२ वर्षाच्या आयुष्यात तिने एक-दोन हिंदी सिनेमा गुपचूप पाहिला होता. त्यात अभिनेत्री ही कमी कपडे घालायची, नाचायची आणि गाणी म्हणायाची. त्यामुळे मरिनाला वाटले की, तिला असा सिनेमात काम करावे लागेल. मरिना स्पष्ट म्हणाली की, मला सिनेमा माहिती आहे की, ते कसे असतात. सिनेमाबद्दल मरिनाचे विचार ऐकून सिद्दिक यांना हसून आले आणि तिला समजावून सांगितले की, हा सिनेमा हिंदी सिनेमासारका ग्लॅमरस नाही.

सिनेमासाठी गुलबहारीला दर महिन्याला ११० डॉलर्स मिळायचे

सिद्दिकने गुलबहारीला सांगितले की, हा सिनेमा ओसामा तालिबानच्या राजवटीत राहणाऱ्या एका असहाय मुलीची कथा असणार आहे. सिनेमाची कथा सांगितल्यानंतर सिद्दिकने त्याला महिन्याला $११० देण्याचे वचन दिले. जेव्हा पैशाचा प्रश्न आला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनीही ते मान्य केले. कारण, त्यावेळी सिद्दिकने मरिनाच्या घरीची आर्थिक स्थिती वाईट होती हे त्यांना माहिती होते. यानंतर मरिनाच्या कुटुंबीयांनी तिला सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला आणि त्यांनी सिनेमाचे शूटिंग सुरू झाले.

सिनेमा निर्मात्यांनी घर दिले, वडिलांचे दुकान उघडले

सिनेमात काम करण्यासाठी $११० च्या दर महिन्याला मिळणाऱ्या पैसाव्यतिरिक्त, सिनेमा निर्माते सिद्दीक बर्माक आणि मखमलबाफ यांनी मरिनाला $१०,००० वेगळे पैसे दिले. या रकमेतून, गुलबहारीने तिच्या कुटुंबासाठी दोन खोल्यांचे घर विकत घेतले. या घराची नोंदणीही आजही मरिनाच्या नावावर होती, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सने दिली आहे.

- Advertisment -

Manini