Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthझुरळांमुळे होवू शकतात 'हे' आजार

झुरळांमुळे होवू शकतात ‘हे’ आजार

Subscribe

जर तुम्ही किंवा घरातील एखादा डायरिया, टाइफाइड, कॉलरा सारखे पोटाच्या समस्यांनी त्रस्त असेल तर यामागील मुख्य कारण म्हणजे घरात असलेली झुरळं. या झुरळांमुळे प्रत्येक वर्षी लाखो लोकांचा जीव जातो. तसेच यांच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो.

डब्लूएचओच्या मते झुरळं ही काळोख, घाण आणि फटींमध्ये लपलेली असतात. त्यांना उजेड अजिबात सहन होत नाही. जमिनीवर पडलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंसह कागद, कापड आणि मृत किडे-मुंग्या खातात. ऐवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या शरिरावरील नख, पापण्या आणि हाता-पायांची त्वचा सुद्धा ते खातात. त्यामुळे घरात झुरळं असतील तर त्यावर उपाय करा.

- Advertisement -

खरंतर साल्मोनेला पॅराटाइफीसोबत झुरळं ई-कोली, स्ट्रेप्टोकॉकस, स्टॅफिलोकोककस सारखे बॅक्टेरिया, काही प्रकारचे वायरस, फंगस आणि पॅरासाइट्स सुद्धा पसरवतात. ज्यामुळे व्यक्तीला पेचिश, प्लेग, गॅस्ट्रोएंटेरिटिस, लेप्रोसी, जिआर्डिया, लिस्टेरियोसिस, साल्मोनेलोसिस सारखे आजार होऊ शकतात. या व्यतिरिक्त झुरळं ही कॅंम्पाइलोबेक्टर नावाचा आजार ही फैलावतात. यामुळे रुग्णाला डायरिया, उलटी, ताप, पोटात दुखणे अशा समस्या उद्भवतात.

- Advertisement -

घरात फिरत असलेली झुरळं ही आपले लाळ ही जमिनीवर टाकतात. या दरम्यान ते फळं, भाज्यांसह खाण्यापिण्याच्या गोष्टींसह अन्य गोष्टी जसे की, भांडी, क्रॉकरीवर ही फिरतात. यावेळीते आजार पसरवणारे बॅक्टेरिया आणि वायरस सोडतात. या गोष्टींच्या संपर्कात आल्यानंतर डोळे, नाक, तोंड आणि खुल्या जखमांना स्पर्श केल्यानंतर जर्म्स हे शरिरात जातात.

झुरळांना घरापासून दूर ठेवण्यासाही करा ‘हे’ काम
-घरात भितींला किंवा कोणत्याही ठिकाणी छिद्र असतील ती बंद करा
-पाणी गळत असेल तर ते सील करा
-कचरा ठेवत असलेली जागा स्वच्छ आणि सुकी ठेवा
-कचरा डबा नेहमी बंद ठेवा
-खाण्याच्या गोष्टी एअरटाइड डब्यात ठेवा
-किचमध्ये सामान ठेवले जाणारे कॅबिनेट्स स्वच्छ ठेवा
-भांडी वापरुन झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून ठेवा
-फ्रिज, टोस्टर सारख्या वस्तू सुद्धा स्वच्छ करा


हेही वाचा- प्रवासात गाडी लागते का? मग करा हे उपाय

- Advertisment -

Manini