Wednesday, May 8, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना प्लास्टिक पासून ठेवा दूर, द्या 'ही' लाकडी खेळणी

मुलांना प्लास्टिक पासून ठेवा दूर, द्या ‘ही’ लाकडी खेळणी

Subscribe

लहान मुले खेळताना प्रत्येक खेळणी ही तोंडात टाकतात, हे सर्वांच माहिती आहे. जर लहान मुलांची खेळणी ही जर प्लास्टिकपासून बनलेली असेल, तर या खेळणींचा लहान मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. यासाठी पालकांनी मुलांना लाकडापासून बनलेली खेळणी द्यावी, जेणे करून त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि मुलांना या खेळण्यांनी इजा होण्याची शक्यताही कमी असते. लाकडी खेळणी ही बाजारात आणि ऑनलाईन सहज उपलब्ध मिळतात.

 

- Advertisement -

या खेळणांमध्ये ABDC, नंबर, कार, रॅटल्स आणि किचन सेट याशिवाय अनेक आकर्षक आणि शैक्षणिक खेळणी विक्रीमध्ये उपलब्ध आहेत. ही खेळणी जर तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर यावर अनेकदा सूट देखील मिळते. यामुळे ही खेळणी तुम्हाच्या खिशाला ती पडवडू शकतात.

- Advertisement -

लाकडी Alphabets Letters

लहान मुलांना ABCD शिकवण्यासाठी या लाकडी खेळण्यांचा उत्तम वापर करू शकता. ही खेळणी लाडापासून बनवलेली आहेत. जेणेकरून खेळताना मुलाने तोंडात टाकले तर काहीही नुकसान होत नाही. ABCD व्यतिरिक्त, या प्रकारच्या बोर्डवर नंबरिंगचा संच देखील उपलब्ध आहे. ही लाकडी शैक्षणिक खेळणीही अनेक सेटमध्ये खरेदी करता येतात.

वेगवेगळ्या आकाराची खेळणी

2-5 वयोगटातील मुलांचया ब्रेन डेवलपमेंट करण्यासाठी त्रिकोणी, चौकणी, गोल आणि आयता या आकाराची लाकडी खेळणी तुम्हाला ऑनलाईन आणि मार्केटमध्ये सहज मिळतात. या खेळण्यांनी मुलांचा शिक्षणिक आणि ब्रेन डेवलपमेंटसाठी चांगला पर्याय आहे. या खेळण्यांमुळे मुले वस्तूचा आकार ओळखण्यास मदत होते.

बॉलिंग गेम

हा बॉलिंग गेम मुलांसाठी घरी खेळण्यासाठी खूप मजेदार आहे. हा लाकडापासून बनलेला मिनी बॉलिंग सेट आहे. दोन मुले एकत्र खेळू शकतात किंवा मुले पालकांसोबतही हा खेळ खेळू शकतात.

लहान मुलांसाठी किचन सेट

लहान मुलांना स्वयंपाक, किचन सेट किंवा अशा प्रकारच्या खेळणी खूप आवडतात. ही खेळणी खास करून मुलींना खेळायला खूप आवडतात. मुलांसाठी लाकडी कार, बस, ट्रक, रॅटल्स आणि इतर प्रकारची खेळणीही उपलब्ध आहेत. ही लाकडी कार अतिशय मजबूत आणि चालवण्यास अतिशय सोपी आहे. हे 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आहे. त्याची पकड खूप चांगली आहे आणि चाक खूप मजबूत आहे. या ब्रँडमध्ये इतर अनेक प्रकारच्या लाकडी खेळण्यांचे पर्याय आहेत.


हेही वाचा – Summer Vacation… उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini