Saturday, April 27, 2024
घरमानिनीRelationshipलहान मुलांचे कान टोचल्यानंतर 'या' चुका करणे टाळावे

लहान मुलांचे कान टोचल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळावे

Subscribe

मुलांचे अगदी कमी वयात कान टोचले जातात. असे मानले जाते की, लहान वयात कान आणि नाक टोचल्याने फार कमी दुखते. परंतु बहुतांश आई-वडिलांना माहिती नसते की, पियर्सिंग केल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी. यावर डॉक्टर काय म्हणतायत याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Ear piercing for kids)

कान टोचल्यानंतर काय करावे
मुलांचे कान टोचल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे. खासकरुन कान टोचले असतील तर तो लवकर कसा बरा होईल याकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन इंन्फेक्शनचा धोका ही कमी होईल. जेथे पियर्सिंग केले असे तेथे सलाइन सॉल्यूशन किंवा माइल्ड एंन्टीसेप्टिक सोल्यूशन दिवसातून दोन वेळा स्वच्छ करा.

- Advertisement -

कान टोचल्यानंतर अशी घ्या काळजी
मुलाला किंवा एखाद्याला पियर्सिंगच्या ठिकाणी हात लावून देऊ नका. तसेच अस्वच्छ हात त्याला लावू नका. जेणेकरुन इंन्फेक्शन वाढले जाऊ शकते. अशातच बेस्ट असेल की, तुम्ही ती जागा होईल तेवढी स्वच्छ ठेवा. तसेच स्वच्छ केल्यानंतर कानातले फिरवुन पहा. जेणेकरुन ते चिकटले जाणार नाहीत.

- Advertisement -

कान टोचल्यानंतर काय करु नये
कान टोचल्यानंतर ईअर रिंग काही दिवस काढू नये. त्यानंतर कान टोचणाऱ्याकडून ते ईअर रिंग काढून घ्या. अन्यथा इंन्फेक्शन होऊ शकते. बाळाला अंघोळ घालताना शॅम्पू, साबण हा पियर्सिंगच्या ठिकाणापासून दूर ठेवा. अंघोळ घातल्यानंतर कान टोचलेली जागा सुकवा. (Ear piercing for kids)

पियर्सिंग केल्यानंतर पीडियाट्रिशियन तुम्हाला त्याची काळजी घेण्यासंदर्भात काही गोष्टी सांगतात. लक्षात ठेवा की, रात्री झोपताना मुलाच्या कानावर अधिक दबाव टाकू नका. नेहमीच लक्षात ठेवा की, प्रत्येक मुलं हे वेगळं असते. त्यामुळे एखाद्याचे मार्गदर्शन किंवा सल्ल्यानुसार मुलाच्या कानाची काळजी घ्या.


हेही वाचा- बालपणीच मुलांना शिकवा ‘हे’ शब्द, आयुष्यभर राहतील तुमचे ऋणी

- Advertisment -

Manini