Saturday, April 13, 2024
घरमानिनीReligiousहातात मंगळसूत्र घालणे योग्य आहे का?

हातात मंगळसूत्र घालणे योग्य आहे का?

Subscribe

मंगळसूत्र हा लग्न झाललेया स्त्रीचा महत्वाचा अलंकार मानला जातो. मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी तयार होतो. मंगल आणि सूत्र अर्थात पवित्र सूत्र. देशात अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे. मंगळसूत्र हे सौभाग्यचं लक्षण मानले जाते. हे महिलांसाठी सर्वात महत्वाचे आभूषण आहे. सोनाच्या आणि काळया मण्यांनी मंगळसूत्र बनविण्यात येते. हल्ली तर विवाहित महिला गळ्यात नाही तर हातात ब्रेसलेट म्हणून मंगळसूत्र घालतात.आजकाल गळ्यात फॅन्सी मंगळसूत्र घालण्याचा जेवढा ट्रेंड सुरु आहे तेवढाच हातात मंगळसूत्र घालण्याचाही ट्रेंड सुरु आहे. पण ,खरंच हातात मंगळसूत्र घालणे योग्य आहे का?

मंगळसूत्र हा एक पारंपरिक अलंकार आहे जो विवाहित महिला त्यांच्या वैवाहिक स्थितीचे प्रतीक म्हणून परिधान करतात. मंगळसूत्रामुळे पतीला समृद्धी, दीर्घायुष्य आणि त्याचे कल्याण होते असे मानले जाते. मंगळसूत्र हा केवळ एक दागिना नसून हिंदू परंपरेत त्याचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्व आहे.

- Advertisement -

मंगळसूत्र हातात घालता येईल का?

हातावर मंगळसूत्र घालणे ही हिंदू परंपरा नाही, पण, असे असले तरी ते हातावर घालता येऊ शकते. सामान्यतः मंगळसूत्र गळ्यात परिधान केले जाते, जे विवाहाचे प्रावित्र्य सिद्ध करण्यासाठी ओळखले जाते. हातावर ते घालणे सामान्य, धार्मिक आणि सामाजिक संर्दभात असामान्य असू शकते. परंतु, ती तुमची वैयक्तिक निवड आहे.

- Advertisement -

मंगळसूत्र कोणत्या हातात घालायचे ?

जर हातात मंगळसूत्र घालायचे असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ते उजव्या हातातच घालावे जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. वास्तविक, डाव्या हाताचा वापर कोणत्याही शुभ कार्यात केला जात नाही, त्यामुळे लग्नाशी संबंधित दागिने डाव्या हाताऐवजी उजव्या हातातच घालावेत.

मंगळसूत्र कोण घालू शकते?

विवाहित स्त्रीच्या जीवनात मंगळसूत्राचे महत्व अनन्यसाधारण आहे आहे. ते परिधान करण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि ते परिधान करण्याला केवळ धार्मिक अर्थच नाही तर सामाजिक आणि पारंपरिक महत्व देखील आहे. हिंदू धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबाशी सुसंवाद राखण्यासाठी ते परिधान करतात. मंगळसूत्रात काळे मणी वापरले जातात आणि ते अतिशय पवित्र मानले जातात. धार्मिक विचारसरणीनुसार,मंगळसूत्र लग्नानंतरच परिधान केले पाहिजे कारण ते स्त्रीच्या विवाहित स्थितीचा अर्थ राखण्यास मदत करते.

मंगळसूत्र घालण्याचे फायदे –

मंगळसूत्र हा केवळ दागिना नसून ते दोन आत्म्यांमधील प्रेम,बंध, आणि भावनिक संबंधाचे प्रतीक आहे. त्यात अनेक सांस्कृतिक मूल्य आणि भावना आहेत. हिंदू विवाहांमध्ये पती जेव्हा मंगळसूत्र पत्नीच्या गळ्यात बांधतो तेव्हा दोघांमध्ये सामंज्यस राखण्यासाठी ते घालण्याची शिफारस केली जाते.

मंगळसूत्रातील मणी –

मंगळसूत्रात काळे मणी वाईट शक्तीपासून तुमचे रक्षण करते असे मानले जाते. आपल्याकडे काळ्या रंगाचा संबंध अनेकदा नकारत्मक शक्तींपासून बचाव करण्याशी संबंधित आहे. काळे मणी विवाहित स्त्रीचे रक्षण करते आणि आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित करते असे मानले जाते. काळा रंग ताकद आणि लवचिकतेशी संबधीत आहे. लग्नाचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला असतो आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र हे विवाहित जोडप्यासाठी जीवनातील आव्हाने अतूट ताकदीने आणि एकलतेने पेलण्यासाठी मदत करते. साधारणपणे, गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा सल्ला दिला जातो, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते हातात ब्रेसलेट म्हणून घालू शकता.

 

 

 


हेही वाचा : विवाहित महिलांनी दुसऱ्यांसोबत शेअर करु नये ‘या’ 5 वस्तू

- Advertisment -

Manini