घरमहाराष्ट्रSanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी, राऊतांची वंचितबाबत स्पष्ट भूमिका

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी, राऊतांची वंचितबाबत स्पष्ट भूमिका

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याचा घेतलेला निर्णय हा एकतर्फी आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती संपुष्टात आली असल्याची घोषणा केली आहे. परंतु, त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत केली नाही. त्यामुळे याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याचा घेतलेला निर्णय हा एकतर्फी आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे राऊतांकडून सांगण्यात आले. (Decision taken by Prakash Ambedkar is unfortunate, Sanjay Raut’s clear stand on Vanchit Bahujan Aghadi)

हेही वाचा… Maharashtra Politics : राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; आंबेडकर-प्रकाश शेंडगे यांच्यात चर्चा

- Advertisement -

आज (ता. 24 मार्च) खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती तोडल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत केलेल्या युतीला दीड वर्ष होऊन गेले आहेत. ती युती अत्यंत चांगल्या हेतूने झालेली होती. त्या युतीमध्ये लोकसभेचे विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्रित काम करता येईल आणि महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याविरोधात एकत्र लढता येईल, ही त्यावेळी दोन्ही पक्षातील नेत्यांमधील भूमिका होती, असे संजय राऊतांनी सांगितले.

तसेच, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आंबेडकर भवनात जाऊन शिवसेना-वंचितच्या युतीची घोषणा केली होती. या युतीच्या घोषनेनंतर महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांमध्ये चैतन्याची लाट उसळली. ठाकरे आणि आंबेडकर यांचे फार जुने नाते आहे. ते एकत्र आले, त्याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झाला. ही युती करताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करावे, अशी भूमिका होती. पण विधानसभा आणि महानगरपालिका या स्तरावर काम करू, असे त्यावेळी ठरले. ज्यानंतर उत्तम चर्चा आणि उत्तम संवाद या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये झाला, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी…

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैवी आहे. याबाबत दोन नेत्यांमध्ये चर्चा होणे गरजेचे होते. जर युती करताना एकत्र चर्चा झाली तर दूर होताना एकत्र चर्चा झाली असती तर ते राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झाले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. प्रकाश आंबेडकर हे मविआचे घटक आहे. त्यामुळे लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता आणि तो कायम आहे. त्यामुळे राज्याच्या नाही तर देशाच्या हितासाठी, लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -