घरमनोरंजनशाही विवाह सोहळे, पण चर्चा अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्राचीच!

शाही विवाह सोहळे, पण चर्चा अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्राचीच!

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून कलाविश्वात लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत. ऑन स्क्रिन लग्नसोहळा अनुभवणाऱ्या कलाकरांनी त्यांच्या रिअय आयुष्यातला लग्नसोहळाही अत्यंत खास पद्धतीने केला आहे.
मागील काही दिवसांमध्ये गौतमी देशपांडे – स्वानंद तेंडूलकर , स्वानंदी टीकेकर-आशिष कुलकर्णी , तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, पूजा सावंत- सिद्धेश चव्हाण या कलाकारांनी त्यांच्या वैवाहिक जीवानाची सुरुवात केली. त्यांचा लग्नातला लूक, शाही विवाहसोहळे या सगळ्यांमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्रांनीच.

अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात पेस्टल थीम सिलेक्ट केली होती. तसेच काहींनी त्याचा विवाहसोहळा शाही पद्धतीने केला. या सर्वामध्ये अभिनेत्रींच्या मंगळसूत्राने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. ऑन स्क्रिन अनेक अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची चर्चा होते. यामधील अनेक मंगळसूत्र ही अभिनेत्रींच्या पात्रांच्या नावाने अगदी फेमस देखील होतात. पण या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात मात्र पारंपारिक मंगळसूत्राची निवड केली.

- Advertisement -

लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रींची पारंपारिक मंगळसूत्र

या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी पारंपारिक मंगळसूत्राची निवड केली. काळे मणी, दोन वाट्या अशी पारंपारिक डिझाईन या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची आहे. मंगळसूत्र हा प्रत्येकीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातच अभिनेत्रींच्या लूक पासून त्यांच्या दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते. त्यामुळे अनेकांना या गोष्टीची फार उत्सुकता देखील असते. पण या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नामध्ये साध्या आणि पारंपारिक मंगळसूत्राची निवड केल्याचं पाहायला मिळाले.

Preview

- Advertisement -

स्वानंदी टीकेकरने तिच्या लग्नात पारंपारिक स्टाइलचे काळे आणि सोनेरी मनी असलेली आणि दोेन वाट्या असलेल मंंगळसूत्र परिधान केलं होतं.

Preview

पुजा सावंतच्या ही सिंपल आणि सुंदर मंगळसूत्राने लक्ष वेधलं होतं.

Preview

तितिक्षा तावडे हिने देखील लग्नसोहळ्यासाठी पारंपारिक मंगळसूत्राची निवड केली

Preview

गौतमी देशपांडेने लग्नात साध्या आणि पारंपारिक मंगळसूत्र परिधान केलं होतं.

Preview

3 मार्च 2024 रोजी योगिता चव्हाण हिचा विवाहसोहळा पार पडला. तिनेही सुंदर मंगळसूत्र घातलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -