Saturday, May 11, 2024
घरमानिनीBeautyकेसांचा कलर टिकून राहावा यासाठी काय करायचं? वाचा

केसांचा कलर टिकून राहावा यासाठी काय करायचं? वाचा

Subscribe

तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर केला असेल किंवा घरी कलर लावला असेल. पण हा कलर लवकर निघून जातो. तुमच्या हेअर कलर जास्त काळ टिकावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. तुम्ही योग्य काळजी न घेतल्याने तुमचा हेअर कलर वेळे आधीच निघून जातो. हेअर कलर जास्त काळ टिकविण्यासाठी तुम्ही काय करावे आणि तुम्ही कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात आज माहिती देणार आहोत.

उन्हात जाणे टाळा

हेअर कलर जास्त काळ टिकविण्यासाठी आणि केसांना नुकसान होऊ नये म्हणून जास्त वेळ उन्हात राहू नका. उन्हात जास्त वेळ राहिल्याने हेअर कलर लवकर निघून जातो. हेअर कलरचा रंग देखील बदलू शकतो.

स्विमिंग नंतर केस धुवा

स्विमिंग पूलच्या पाण्यात क्लोरीन असल्याने कलर केलेल्या केसांसाठी ते जास्त धोकादायक असते. यामुळे स्वीमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी तुमचे केस ओले करुन घ्यावे. यानंतर स्विमिंग पूलमध्ये जावे. स्विमिंगनंतर पुन्हा केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. जेणेकरून तुमचा हेअर कलर लवकर निघून जाणार नाही.

 गरम पाणी वापर करू नका 

केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे तुमचा हेअर कलर लवकर निघून जातो. त्याचबरोबर तुमचे केस कोरडे होतात. तुम्ही केस धुण्यासाठी थंड पाणी किंवा कोमट पाण्याने  केस धुतल्याने तुमच्या हेअर कलरला नुकसान होत नाही.

हेअर कलरसाठी बनविलेल्या शॅम्पू वापर

कलर केसांसाठी बनविलेल्या प्रोटेक्टिंग शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करावा. यामुळे तुमच्या केसांचा कलर लवकर जाणार नाही. या शॅम्पूच्या वापरणे यूव्ही डॅमेजपासून देखील केसांचे संरक्षण होते.
________________________________________________________________________

हेही वाचा  – जाणून घ्या दर 3 महिन्यांनी हेअर स्पा करावा का?

- Advertisment -

Manini