Friday, May 3, 2024
घरमानिनीमहिलांनो सावधान, मोठी ब्रेस्ट म्हणजे धोक्याची घंटा !

महिलांनो सावधान, मोठी ब्रेस्ट म्हणजे धोक्याची घंटा !

Subscribe

महिलांच्या ब्रेस्ट , पार्श्वभाग, आणि जांघांवर फॅट्सचे थर जमायला लागतात. शरीर स्थूल आणि थुलथुलीत होतं. त्यातही ज्यांच्या ब्रेस्टचा आकार मोठा असतो अशा महिलांना सर्वाधिक धोका असो.

शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त फॅट्स जमा होणे ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा समजली जाते. यामुळे वजन वाढल्यावर त्यावर नियंत्रण मिळवणही तेवढच गरजेचे आहे. त्यासाठी शरीराची हालचाल करणे, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. पण बऱ्याचजणी यास अनुत्सुक असतात यामुळे कालांतराने अशा महिलांच्या ब्रेस्ट , पार्श्वभाग, आणि जांघांवर फॅट्सचे थर जमायला लागतात. शरीर स्थूल आणि थुलथुलीत होतं. त्यातही ज्यांच्या ब्रेस्टचा आकार मोठा असतो अशा महिलांना सर्वाधिक धोका असो.

कारण वाढणाऱ्या फॅट्समुळे शरीरात हानिकारक रसायनांचा प्रमाण वाढू लागते. ज्यात शरीराला सूज येणे, डायबेटिस टाईप २ सारखे आजार मागे लागतात. तज्ज्ञांच्या मते हिप्सवर वाढणाऱ्या फ२ट्समुळे स्नायू दबले जातात.त्यामुळे हृदयासंबंधी तक्रारी उद्भवतात. डायबिटीजचा धोका अधिक बळावतो.

- Advertisement -

काहीजणींच्या पोटावर फॅट्सच थर जमायला लागतो, त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. अशा महिलांमध्ये डिप्रेशन, डिमेंशिया आणि डायबिटीजबरोबरच स्ट्रोक आणि कॅन्सरचा धोका असतो.

- Advertisement -


२००८ सालच्या संशोधनानुसार ज्या महिलांच्या ब्रेस्ट मोठ्या असतात त्यांना प्रामुख्याने डायबिटीज होतो. शरीरात विसरल फॅट्सचा स्तर वाढत असल्याने इतर आजारांचा धोका या महिलांना सर्वाधिक असतो. त्यातही ज्या महिलांच्या कुटुंबात कॅन्सर हिस्ट्री असते. अशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे शरीरावरील वाढणाऱ्या फॅट्सकडे या महिलांनी गांभीर्याने पाहावे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगाबरोबरच डाएटकडेही लक्ष द्यावे.

- Advertisment -

Manini