Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousरुद्राक्ष धारण करण्यापूर्वी करा 'या' नियमांचे पालन

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी करा ‘या’ नियमांचे पालन

Subscribe

हिंदू धर्मात रुद्राक्षाला खूप पवित्र मानले जाते. शिवाय रुद्राक्षाला भगवान शंकरांचे प्रतीक मानले जाते. असं म्हणतात की, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूंमधून झाली होती. त्यामुळे रुद्राक्षात भगवान शंकरांचा अंश असल्याचं म्हटलं जातं. मान्यतेनुसार रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीवर भगवान शंकरांची कृपा राहते. त्यामुळे अनेक शिवभक्त हातात किंवा गळ्यात रुद्राक्ष धारण करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, 1 मुखीपासून 21 मुखी रुद्राक्षाचे वर्णन शास्त्रामध्ये केले आहे. हे धारण केल्याने व्यक्तीच्या आरोग्यासंबंधीत समस्या दूर होतात शिवाय यामुळे धार्मिक कार्यातील रस वाढतो. प्रत्येक रुद्राक्षाचे वेगवेगळे महत्त्व आहे. परंतु हे धारण करण्याऱ्या व्यक्तींना काही नियामांचे पालन करायला हवे. नाहीतर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तींनी करा ‘या’ नियमांचे पालन

- Advertisement -

880+ Rudraksha Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Rudraksha mala, Rudraksha beads

  • ज्योतिष शास्त्रानुसार, रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ नेहमी सोमवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी धारण करावी.
  • रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिंपळ्या रंगाच्या धाग्यात घालावा. रुद्राक्ष कधी काळ्या रंगाच्या धान्यात घालू नये.
  • रुद्राक्षामध्ये साक्षात भगवान शंकारांचा अंश असल्याचे मानले जाते. रुद्राक्षामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. परंतु जे लोक मांसहार करतात शिवाय दारु,सिगारेट याचे व्यसन करतात. त्यांनी कधीही रुद्राक्ष धारण करु नये. यामुळे रुद्राक्ष अशुद्ध होतो आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

Rudraksha wearers must follow these rules

- Advertisement -
  • गर्भवती स्त्रियांनी देखील कधीही रुद्राक्ष धारण करु नये.
  • झोपताना कधीही रुद्राक्ष जवळ ठेवू नये. रुद्राक्ष धारण केल्यावर ब्रह्मचर्याचे पालन करावे.
  • रुद्राक्षाला कधीही खराब हातांनी स्पर्श करु नये.
  • आपल्या राशीनुसार तज्ञांचा सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावे.
  • रुद्राक्ष घालून कधीही स्मशानभूमीत जाऊ नये.

 

 


हेही वाचा :

चंद्रदेवाने केली होती श्री सोमनाथ मंदिराची स्थापना; जाणून घ्या कथा

- Advertisment -

Manini