घरताज्या घडामोडीHSC Result : बारावीच्या निकालात मुंबई विभागातून रायगडची बाजी

HSC Result : बारावीच्या निकालात मुंबई विभागातून रायगडची बाजी

Subscribe

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विभागीय मंडळाचा 88.13 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागातून रायगड विभागाचा सर्वाधिक 90.53 टक्के निकाल लागला आहे. रायगडने यंदा प्रथम क्रमांकावर बाजी मारली असली तरी मागील चार वर्षाचा मुंबई विभागीय मंडळांचा निकाल पाहता यंदाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या निर्बधानंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमांसह सेंटरनुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या निकालातही मुलांना मागे टाकत चार टक्क्यांनी अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

उच्च माध्यमिक परिक्षेच्या निकालात राज्यातून 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. तर 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी राज्याचा 91.25 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 31 हजार 161 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 3 लाख 29 हजार 337 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 90 हजार 258 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई विभागीय मंडळाचा 88.13 टक्के निकाल लागला आहे. कोकण विभागीय मंडळाने यंदा 96.1 निकालांची टक्केवारी गाठत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मुंबई विभाग नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

टक्केवारी घसरली

कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधामध्ये ऑनलाईन तसेच गतवर्षी शालेय स्तरावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे निकालाचा उच्चांक पाहावयास मिळाला होता. परंतु यंदा 100 टक्के अभ्यासक्रम आणि सेंटरनुसार परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळाची सन 2020मध्ये 89.35 टक्के, सन 2021 मध्ये 99.79 टक्के, तर सन 2022मध्ये 90.91टक्के असणारी निकालाच्या टक्केवारीत घसरण यंदा सन 2023मध्ये 88.13 टक्के निकाल लागला आहे.

- Advertisement -

मुलींच्या निकालात चार टक्के वाढ

बारावीच्या परिक्षेत मागील काही वर्षांपासून मुलींनी सर्वाधिक बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचा प्रमाणाचा आलेख चढता आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालात चार टक्के वाढ झालेली आहे. मुलांचा निकाल हा 86.06 टकके तर मुलींचा निकाल हा 90.42 टक्के लागला आहे.

श्रेणी निहाय निकाल

प्रविण्यासह प्रथम श्रेणी 75 टक्के व पुढे अधिक टक्के घेणारे 38 हजार 884, प्रथम श्रेणी 60 टक्के व पुढे 77 हजार 322, द्वितीय श्रेणी 45 टक्के व पुढे 1 लाख 26 हजार 755 व उत्तीर्ण क्षेणी त 47 हजार 297 विद्याार्थी उत्तीर्ण झालेले आहे.

जिल्हानिहाय निकाल

ठाणे 88.90
रायगड 91.94
पालघर 90.76
बृहन्मुंबई 84.21
मुंबई उपनगर 1 86.80
मुंबई उपनगर 2 86.32

कोरोनानंतर यंदा प्रथमच शंभर टक्के क्षेमतेसह संपूर्ण अभ्यासक्रमांवर सेंटरनुसार बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा निकालाची टक्केवारी कोरोनाच्या खंडित कालावधीनंतर थेट परीक्षा झाल्याने घसरली आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपी मुक्त अभियान देखील राबविण्यात आले होते. तर विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात आल्या होत्या.

-नितीन उपासनी, विभागीय अध्यक्ष मुंबई मंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -