Sunday, April 28, 2024
घरमानिनीCoconut Burfi : घरी बनवा नारळाची बर्फी

Coconut Burfi : घरी बनवा नारळाची बर्फी

Subscribe

नारळी काप आरोग्यदायी पदार्थ आहे. यामध्ये असेलेले घटक शरीराला एक ऊर्जा देतात.

कोकणातील प्रसिद्ध गोड पदार्थ म्हणजे नारळी बर्फी. हा गोड पदार्थ विशिष्टपणे सणासुदीला प्रामुख्याने बनवला जातो. तसेच ओल्या खोबऱ्याचा हा गोड पदार्थ खूप आवडीने खाल्ला देखील जातो. या पदार्थाला अनेक ठिकाणी खूप मागणी आहे. ओल्या खोबऱ्यामुळे तोंडाला एक चांगली चव येते. तसेच जेवणात जर ओलं खोबरं टाकलं तर जेवण देखील छान चवदार होते. नारळाच्या या बर्फीला नारळी काप देखील म्हणतात.
Maharashtra Tourism on Twitter: "Naralachi Vadi or coconut barfi is a  famous traditional sweet dish in Maharashtra prepared during festivals and  special occasions. What's your favourite memory of Naralachi Vadi  #MaharashtraTourism #Food #

आता आपण जाणून घेऊया नारळी बर्फीसाठी लागणारे साहित्य आणि कृती-
साहित्य-

  • एक मध्यम नारळ
  • २ छोटे चमचे तूप
  • पाव लिटर दूध
  • पाव किलो साखर|
  • अर्धा चमचा वेलची पावडर
  • १ लहान चमचा पिस्त्याचे बारीक काप (आवडीनुसार)

Naral Vadi (Coconut Burfi) Recipe by Shilpa Wani - Cookpadपाककृती-

- Advertisement -
  • सर्वप्रथम नारळ खोवून घ्यावा.
  • यानंतर खोबरे, साखर व दूध एकत्र शिजत ठेवावे.
  • शिजत असतांना सारखे हलवावे.
  • गोळा झाल्यावर त्यात वेलचीची पूड घालून एकत्र करावे.
  • ताटाला छान तूप लावून त्यावर गोळा थापावा.
  • तसेच पिस्त्याचे काप किंवा चारोळी टाकून हलक्या हाताने हा गोळा थापून घ्यावा.
  • हा गोळा जरा गार झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.
  • हे झाल्यावर या वड्या सुकत ठेवाव्या.
  • यानंतर नारळाची बर्फी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

हेही वाचा : 

 

- Advertisment -

Manini