घरमहाराष्ट्र"...स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळोत", संजय राऊतांचा राज ठाकरेंना...

“…स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळोत”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

मुंबई | “जे स्वयंभू असतात, त्याच स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळोत. आणि तो मान ठाकरे कुटुंबीयांना मिळतो”, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. राज ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नांबाबत संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिला आहे. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’ या पुरस्कार सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची ( Raj Thackeray) मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंना प्रश्न केला की, तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना काय सांगणार?, असा प्रश्न केला होता. यावर राज ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे हे स्वयंभू आहे. तसेच आदित्य ठाकरे देखील स्वयंभू आहेत”, असे उत्तर त्यांनी दिले.

राज ठाकरे यांची बुधवारी मुलाखत झाली, यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना स्वयंभू म्हटले, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “होय, आम्ही स्वयंभूच आहोत. जे दैवते असतात त्यांच्या मागेच जनता जाते. इतर कोणी जे दगडांना शेंदूर फासतात आणि आता यांना देव म्हणा म्हणून सांगतात, त्यांचे लोक ऐकत नाहीत. या शेंदूर फासलेल्या दगडांना लोक वाकून नमस्कार देखील करत नाहीत. जे स्वयंभू असतात, त्याच स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळोत. आणि तो मान ठाकरे कुटुंबीयांना मिळतो. यामुळे कोणाला पोटदुखी असेल तर त्यांनी सांगावे, आमच्याकडे त्यावर उपचार आहे”, असे ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – “भीमा-पाटस साखर कारखाना नवाज शरीफचा आहे का?”, संजय राऊतांचा सवाल

देशात आणि महाराष्ट्रात भाकरी फिरवण्याची वेळी आली

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे, असे शरद पवार त्यांनी कार्यक्रमात तरुणांना संधी देण्यावरून पक्षात बदल करण्याचे संकेताना म्हणाले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर म्हणाले, “शरद पवारांनी त्यांच्या पक्षासंदर्भात जे वक्तव्य केले आहे. त्यासंदर्भात मी काही बोलणार नाही. पण, जे काही देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे. ते पाहता देशात आणि महाराष्ट्रात भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे. भाजपाचे राजकारण हे बॉम्बस्फोट, हत्याकांड आणि दंगली घडवणार राजकारण असून आम्ही त्या मार्गाने जणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -