Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthपीरियड क्रॅम्प्स पासून आराम देतील 'या' Wall Yoga Pose

पीरियड क्रॅम्प्स पासून आराम देतील ‘या’ Wall Yoga Pose

Subscribe

घरातील-घराबाहेरील जबाबदाऱ्यांमुळे आपल्याकडे फार कमी वेळ असतो. काम आणि फिटनेस यामध्ये संतुलन राखणे सध्या मुश्किल होत आहे. अशातच पीरियड्स येतात तेव्हा बहुतांश महिलांच्या पोटात किंवा पाय खुप दुखतात. परंतु अशा दुखण्यावेळी तुम्ही काही सोपी योगासन करु शकता. जेणेकरुन पीरियड्सच्या वेळी तुम्हाला आराम मिळेल. अशी काही योगासन आहेत जी भिंतीच्या आधाराने तुम्ही करु शकता.

जेव्हा आपण योगासन किंवा व्यायाम करतो तेव्हा फिल-गुड एंडोर्फिन हॉर्मोन्सचे सीक्रेशन होते. यामुळे दुखणे कमी होते. योगाभ्यास किंवा व्यायामादरम्यान शरिराची अधिक हालचाल होते. असे केल्याने शरिरात रक्त संचार सुरळीत होते. त्याचसोबत पीरियड क्रॅम्प्स पासून आराम ही मिळतो. या व्यतिरिक्त तणाव आणि एंग्जायटीचा स्तर ही कमी होतो.

- Advertisement -

पीरियड्सच्या वेळी वेट लिफ्टिंग, धावणे, स्कॉट्स, जंपिंग असे हाय इनटेंसिटी असणारे वर्कआउट करु नये. यामुळे ब्लड फ्लो प्रभावित होऊ शकते. तसेच हार्मोन्समध्ये समस्या निर्माण करण्यासह हेवी फ्लो चे सुद्धा कारण बनू शकते. पीरियडच्या वेळी काही योगासन ब्लोटिंग आणि मूड स्विंग सारख्या सामान्य लक्षणांना कमी करण्याचा प्रभावी मार्ग असू शकतो.

लेग्स-अप-द-वॉल पोज
पायांची सूज कमी करण्यासाठी लेग्स अप द वॉल पोज बेस्ट पर्याय आहे. जेव्हा संपूर्ण दिवस उभं किंवा बसून रहावे लागते तेव्हा पायाला सूज येऊ शकते. या दरम्यान शरिरात ब्लड सर्कुलेशन उत्तम पद्धतीने होत नाही. अशा स्थितीत पायांना भिंतीच्या आधाराने वर उचलल्यास एकाच ठिकाणी रक्त साठून राहणार नाही.

- Advertisement -

पादोत्तानासन


हे योगासन केल्याने ताण कमी होतोच. पण ब्लड सर्कुलेशन ही उत्तम पद्धतीने होते.

उपविष्टकोणासन


यामुळे शरिर लवचीक होतेच, त्याचसोबत फर्टिलिटीसाठी ही मदत होते.

सर्वांगासन


थायरॉइड, केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पीरियड्स दरम्यानच्या क्रॅम्प्स पासून ही आराम मिळतो.

बद्धकोणासन


यामुळे पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळतो. तसेच इमोशनल ब्लॉकेज, थकवा आणि एंजायटी सु्द्धा कमी होते.


 हेही वाचा- Period Tracker: व्हॉट्सअॅपवर अशी ट्रॅक करता येईल पीरिड्सची तारीख

- Advertisment -

Manini