घरताज्या घडामोडीनेहरुंचा उल्लेख टाळून PM Modi यांचा विरोधकांवर गुलामीच्या मानसिकतेचा आरोप; 'स्वांतत्र्यानंतर योग-आयुर्वेदाचा...

नेहरुंचा उल्लेख टाळून PM Modi यांचा विरोधकांवर गुलामीच्या मानसिकतेचा आरोप; ‘स्वांतत्र्यानंतर योग-आयुर्वेदाचा विसर’

Subscribe

PM Narendra Modi in Nashik नाशिक – योग आणि आयुर्वेद यांना देश स्वातंत्र्य झाल्यानंतर विसरले गेले. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्यात आला आहे. देश सध्या अमृतकाळात असून पुढील 25 वर्षे युवकांसाठी कर्तव्यकाळाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे झालेल्या युवा महोत्सवात म्हटले आहे. देशाचे पुढील भविष्य कसे असेल आणि तरुणांनी काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यासोबत तरुणांनी-युवकांनी आपला इतिहासही विसरायचा नसतो हे देखील मोदींनी सांगितले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख टाळून पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यानंतर गुलामीच्या मानसिकतेने आपलं वैभव असलेल्या योग, आयुर्वेद आणि तृणधान्यांचा जाणीवपूर्वक विसर पाडला गेल्याचा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘अमृतकाळात आपले जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आपले लक्ष्य आहे. आयटी आणि सेवा क्षेत्राप्रमाणेच आपल्याला जगातील पहिले मॅन्यूफॅक्चरिंग हब भारताला बनवायचे आहे.’
पंतप्रधान म्हणाले, ‘देशात अशी तरुण पिढी तयार होत आहे, जी गुलामीच्या दबावातून मुक्त आहे. इतिहास आणि विकास यांचा हातात हात घऊन नवी पिढी पुढे निघाली,’ असल्याचा गौरवोद्गार नरेंद्र मोदींनी काढले.

- Advertisement -

स्वातंत्र्यानंतर योग – आयुर्वेदाला विसरले गेले
अमृतकाळातील युवा पिढीवर माझा सर्वाधिक विश्वास आहे. त्याचे कारण सांगताना पंतप्रधान म्हणाले, अमृतकाळातील तरुण पिढी ही गुलामीचा स्वभाव आणि दबाव यातून पूर्णपणे मुक्त आहे. या पिढीतील तरुण उघडपणे बोलत आहे की, विकास देखील पाहिजे आणि इतिहासातील गौरव देखील पाहिजे.’

योग आणि आयुर्वेद ही भारताची कायम ओळख राहिलेला आहे. असे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांनी याकडे दुर्लक्ष्य केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘योग आणि आयुर्वेद ही कायम भारताची जगात ओळख राहिलेली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर योग आणि आयुर्वेदाला विसरले गेले होते. आज भारतातील तरुण हा योग आणि आयुर्वेदाचा ब्रँड अॅम्बेसिडर बनलेला आहे. जग आपल्या योग आणि आयुर्वेदाकडे वळत आहे.’

- Advertisement -

स्वातंत्र्यानंतर ज्वारी-बाजरीला गरीबांचे अन्न म्हणून हिणवले – मोदी  

पंतप्रधान मोदींनी ज्वारी, बाजरी यासह ग्रामीण भारताच्या स्वंयपाक घरातील अनेक पदार्थांचा उल्लेख करत म्हटले, तुम्ही तुमच्या आजीला विचारुन पाहा, हेच पदार्थ आपल्या स्वंयपाकघरात राहात होते. मात्र गुलामीच्या मानसिकतेने या अन्नाचा संबंध गरीबीशी जोडला. या पदार्थांना स्वंयपाकघरातून हद्दपार केले. आज हेच अन्न तृणधान्याच्या (मिलेट) रुपाने, सुपरफूडच्या रुपाने पुन्हा स्वंयपाकघरात येत आहे. सरकारने या अन्न पदार्थांना ‘श्रीअन्न’च्या श्रेणीची नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाल या ‘श्रीअन्ना’चे ब्रँड अॅम्बेसिडर बनायचे आहे. या अन्न पदार्थांमुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि छोट्या शेतकऱ्यांचेही भले होईल.’ असे मोदी म्हणाले.

हेही वाचा : भारताच्या तरुणाईसाठीचा ‘अमृतकाळ’ सुरू, PM Narendra Modi यांचे युवकांना मार्गदर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -