Friday, May 3, 2024
घरमानिनीKitchenघरी लंचसाठी पाहुणे येणार आहेत, मग अशी करा तयारी

घरी लंचसाठी पाहुणे येणार आहेत, मग अशी करा तयारी

Subscribe

तुमच्या घरी काही दिवस राहण्यासाठी पाहुणे येत असतील, तर त्यासाठी तुम्हाला काही प्री-कुकिंग (Pre-Cooking) आयडिया अंगीकारणे आवश्यक आहे जेणेकरुन तुम्ही पाहुण्यांची चांगली काळजी घेऊ शकाल आणि तुमच्यावर कामाचा जास्त भार पडणार नाही. यासाठी तुम्ही प्री-कुकिंगसाठी काय-काय करायला पाहिजे. याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

 

- Advertisement -

गृहणींना प्री-कुकिंगसाठी काय-काय करावे

1) टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्यांची प्युरी करून घ्यावी. ही टोमॅटो प्युरी तुम्ही डीप फ्रीझमध्ये ठेवून द्या. ही प्युरी तुम्ही 15 दिवस वापरू शकता.

2) पालक उकळवा, यानंतर ती मिक्सरमध् वाटून घ्या, आणि डीप फ्रीझ करा. या पालकांची प्युरी पालक पनीर बनवताना याचा वापर सहज करता येतो.

- Advertisement -

3) शेंगदाणेही भाजून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बारीक करून ठेवू शकता, जेणेकरून फळ आहार बनवताना तुमचा वेळ वाचू शकेल.

4) बटाटे उकळून घ्या. ते थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. हे उकडलेले बटाटे तीन-चार दिवस वापरले जाऊ शकतात.

5) थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, काजू, शेंगदाणे, उडीद डाळ घाला. आता त्यात रवा घालून हलका तपकिरी रंग येईपर्यंत परता. चवीनुसार, मीठ आणि साखर घाला. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा. या नंतर जेव्हा जेव्हा उपमा बनवायचा असेल तेव्हा पाणी उकळून त्यात लिंबू पिळून तयार मिक्स घाला. चव वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार तूपही घालता येते.

6) जर तुम्हाला लापशी बनवायची असेल तर ती आधी भाजूनही घेऊ शकतो

7) कापलेल्या भाज्या आणि सॅलड्स क्लिंग फिल्मने झाकून ठेवल्यास, ते कापल्यानंतर तीन दिवसांनंतरही वापरता येतात.

8) जर सॅलड क्लिंग फिल्मने झाकून ठेवले असेल तर त्यात मीठ घालू नका, अन्यथा त्या ते पाणी सोडेल आणि त्यांचा क्रिस्पी राहणार नाही.

9) भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, जसे- त्या धुवा आणि नंतर पुसून पॉलिथिनमध्ये ठेवा, असे केल्याने भाजी लवकर खराब होत नाही.

10) त्याचप्रमाणे जर तुम्ही हिरव्या मिरच्या मोठ्या प्रमाणात साठवत असाल तर त्यांची देठं काढून साठवून ठेवा.

 

11) पाहुणे येण्यापुर्वीच सफरचंद कापून ठेवा आणि त्याला लिंबू लावून ठेवा, असे केल्याने सफरचंद काळे पडणार नाही.

12) रोज सकाळी कणीक मळताना सायंकाळसाठी देखील कणीक मळून घ्या. सकाळी पोळी (चपाल्यात) बनवल्यानंतर उरलेल्या पिठावर थोडे तेल लावावे. यामुळे पीठ मऊ राहील आणि पोळी (चपाल्या) मऊ होतील.

13) तुम्ही नानचे कणीक सुद्धा आधीच मळून घेऊ शकता. यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. त्या कणीकवर थोडे तेलही लावा. हे कणीक प्रकार दोन-तीन दिवस चालतो.

14) नान बनवताना चव बदलण्यासाठी त्यात बारीक चिरलेला लसूण घाला, यानंतर गार्लिक नान तयार होईल.

15) या नानच्या कणीकने भरलेले नानही तयार करता येतील.

16) कच्चा आंबा किंवा इतर हंगामी फळांचा स्क्वॅश बनवा.

17) कस्टर्ड आणि इतर गोड पदार्थांमध्ये घालून खाऊ शकणारी जेली देखील आधीच तयार केली जाऊ शकते. फक्त लक्षात ठेवा की, ते फक्त तीन दिवस वापरले जाऊ शकते.

18) त्याचप्रमाणे कस्टर्ड देखील बनवता येते आणि फ्रीज मध्ये ठेवता येते आणि ते देखील फक्त तीन दिवस वापरता येते.

19) जर तुम्हाला गोड पदार्थात म्हणून श्रीखंड बनवायचे असेल तर तुम्ही ते आधी तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे देखील बनवल्यानंतर तीन दिवस वापरता येते.

20) केक अगोदरही बनवता येतो. चांगला भाजलेला केक तीन ते चार दिवस खराब होत नाही.


हेही वाचा – किचनसाठी उपयुक्त असलेल्या 10 बेस्ट टीप्स

 

- Advertisment -

Manini