घरमनोरंजन‘आदिपुरूष’मधील हनुमानाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

‘आदिपुरूष’मधील हनुमानाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरूष’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आणि गाणी देखील प्रदर्शित करण्यात आली होती. ज्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. अशातच या चित्रपटाचा हनुमानाचा आणखी एक नवा पोस्टर जारी करण्यात आला आहे. ज्यात संकट मोचन हनुमानाचे विशाल रुप दाखवण्यात आले आहे.

‘आदिपुरूष’मधील हनुमानाचे विशाल रुप आले समोर

दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या ट्वीट शेअर करत हनुमानाचे नवीन पोस्ट शेअर केले आहे. ज्यात हनुमानाचे विशाल रुप दिसत आहे. यात हनुमानाच्या खांद्यावर गंदा देखील दिसत आहे. या फोटोवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोसोबत ओम राऊत यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आम्ही केसरी आहोत, काय बरोबरी.”

- Advertisement -

‘आदिपुरुष’च्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

‘आदिपुरुष’ चित्रपटातील  ‘जय श्री राम राजा राम’ आणि ‘राम सिया राम’ मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. अशातच, हे भक्तीमय गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे गाणं प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहे. तर प्रसिद्ध गायक सचेत आणि गायिका परंपराने हे गायले आहे.

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘टायगर 3’ चित्रपटातील शाहरुख आणि सलमानचा व्हिडिओ लीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -