घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएकाच वेळी ६६ ठिकाणी छापे; जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण

एकाच वेळी ६६ ठिकाणी छापे; जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण

Subscribe

नाशिक :  ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५५० अधिकारी व अंमलदारांनी गुरुवारी (दि.१) पहाटे पाच वाजता गावठी दारूची अवैधपणे गाळप करणार्‍या ६६ ठिकाणी एकाच वेळी छापा टाकले. या छाप्यात ३१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरीछुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु असल्याची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गुरुवारी (दि.१) पहाटे पुन्हा छापासत्र राबवत गावठी दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. अवैध हातभट्टी दारुअड्ड्यांचे उच्चाटन करण्यासाठी २५ मे रोजी ग्रामीण पोलिसांनी ४६ ठिकाणी छापे टाकून गावठी दारू, रसायन व इतर सामुग्री जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली ३४ गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर गुरुवारी (दि.१) पहाटे पाच वाजता ५५० अधिकारी व पोलीस अंमलदारांनी ग्रामीण हद्दीतील हातभट्टीचे अड्डे लक्ष केले.

- Advertisement -

या छापासत्रात सटाण्यामधील ७, कळवणमधील ५, वाडीवर्‍हे, घोटी, जायखेड्यातील प्रत्येकी ४, देवळा, इगतपुरी, सिन्नर एमआयडीसी व सिन्नरमधील प्रत्येकी २ व पेठमधील १ अशा ६६ अड्ड्यांवर कारवाई केली. कारवाईत या अड्ड्यांसह रसायन बनवण्यासाठी लागणार्‍या गुळ विक्रेत्यांवरही कारवाई केली. डोंगर, दऱ्या, नदी- नल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू  हातभटयांवर छापे टाकत मुद्देमाल सील केला.

हेल्पलाईन सुरु
अवैध धंद्यांची माहिती असल्यास नागरिकांनी ६२६२२५६३६३ या हेल्पलाइनवर माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दारुसाठी घातक पदार्थांचा वापर 

गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यासह मानवी जीवनास अपायकारक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. तर, छापा कारवाईत देवळ्यातील चिंचवे गावातील पाझर तलावाचे काठावर लोखंडी पाईप फॅन व बॅटरीचे सहाय्याने भट्टीला अतिरिक्त हवा देण्याचे हॅण्डमेड ब्लोअर हस्तगत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -