Saturday, December 9, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन! वाचा शुभ मुहूर्त

Diwali 2023 : आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन! वाचा शुभ मुहूर्त

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. आज 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी. मात्र, यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

नरक चतुर्दशी मुहूर्त

Narak Chaturdashi is the festival of beauty | Chhoti Diwali: रूप और लावण्य का पर्व है नरक चतुर्दशी | Hindi News, एस्ट्रो/धर्म

- Advertisement -
  • अभ्यंग स्नान : 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 05:28 ते 06:41 पर्यंत करावे.
  • दीपदान : 12 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 05:29 ते रात्री 08:07 पर्यंत असेल.

नकर चतुर्दशी का साजरी केली जाते?

पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असं म्हटलं जातं की, नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासूराचा वध करुन त्याच्या तावडीतून 16 हजार स्त्रियांना मुक्त केले होते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते. मात्र, यंदा नरक चतुर्दशी तिसऱ्या दिवशी असणार आहे. या दिवशी अभ्यंगस्नान करुन पायाखाली कारेटे फोडले जाते. श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त

कैसे करें लक्ष्मी पूजन - Grehlakshmi

- Advertisement -

दिपावली तिथी : रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:44 पासून ते 13 नोव्हेंबर दुपारी 02:56 पर्यंत असेल.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त : रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 05:40 पासून 07:36 मिनिटांपर्यंत असेल.

दिवाळी का साजरी केली जाते?

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.


हेही वाचा :

Diwali 2023 : ‘या’ दिवशी आहे धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज

- Advertisment -

Manini