घरठाणेRaj Thackeray : हिंदू सणांवर बंदी आणू देणार नाही, ठाण्यातील दहीहंडीमध्ये राज...

Raj Thackeray : हिंदू सणांवर बंदी आणू देणार नाही, ठाण्यातील दहीहंडीमध्ये राज ठाकरेंची गरजले

Subscribe

राज ठाकरे हे दहीहंडीच्या निमित्ताने आज ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झालेल्या पथकांचे स्वागत केले.

ठाणे : राज्यभरात गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन अनेक ठिकाणी राजकीय हंड्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहण्यासारखा असतो, त्यात ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अविनाश जाधव यांच्याकडून आयोजित करण्यात येणारी हंडी सर्वांच्या आकर्षणाचा विषय असते. कारण या हंडीमध्ये उपनगरातील राजा अशी ओळख असलेले ‘जय जवान दहीहंडी पथक’ दरवर्षी नवा विक्रम करण्याच्या तयारीत असते. यंदाच्या वर्षी जय जवान दहीहंडी पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वेळी ठाण्याच्या मनसेच्या हंडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. (Raj Thackeray : Will not allow ban on Hindu festivals, Raj Thackeray’s reaction Dahihandi in Thane)

हेही वाचा – मुंबईत 35 तर, ठाण्यात 13 गोविंदा जखमी; एका महिला गोंविदाचाही समावेश

- Advertisement -

राज ठाकरे हे दहीहंडीच्या निमित्ताने आज ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देत अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झालेल्या पथकांचे स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना काही वर्षांपूर्वी दहीहंडीवर बंदी आणण्यात येणार होती, त्यावर भाष्य केले. प्रत्येकवेळी हिंदू आणि मराठी सणांवर बंदी आणण्याचा घाट घालण्यात येत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या या सणांवर अनेकदा बंदी आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु मी तेव्हा ठाम उभा राहिलो. कोर्टाकडून दहीहंडीवर बंदी आणण्याचे प्रयत्न झाले. पण तेव्हा मी सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची दहीहंडी होणार. कोर्टाला जी काही कारवाई करायची आहे, ती त्यांनी माझ्यावर करावी. प्रत्येकवेळी जर का हिंदू सणांवर आणि मराठी सणांवरच बंदी आणत राहणार तर ते माझ्याकडून होणार नाही आणि तुमच्याकडूनही होणार नाही. परंतु आपण आपले सर्व सण नीटनेटकेपणात आणि उत्साहात पार पाडू. कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची आपण सर्वच जण काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -