घरमहाराष्ट्रKapil Patil : कपिल पाटलांची वेगळी चूल, जेडीयूची साथ सोडली; नितीश कुमारांना धक्का

Kapil Patil : कपिल पाटलांची वेगळी चूल, जेडीयूची साथ सोडली; नितीश कुमारांना धक्का

Subscribe

मुंबई : जनता दल युनायटेडला नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या जेडीयू पक्षातील नेते नाराज असल्याचे समजते. कारण महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जेडीयूला सोडचिट्टी देणार आहेत. लोकसभेच्या तोंडावर जनता दलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कपिल पाटील आज स्वतःच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. (Kapil Patil separate hearth left JDU shock to Nitish Kumar)

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावेच; जरांगेंचे पुन्हा आव्हान

- Advertisement -

आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते नाराज होते. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नको, असं त्याचं मत आहे. त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय भूमिकेची घोषणा होणार आहे. ‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प,’ असा नारा देत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन होणार आहे. राज्याचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार आहेत. राज्यभरातील समाजवादी जनता परिवारातले नेते, कार्यकर्ते, जन संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने त्यात सामील होत आहेत.

धारावीतील सभेला उद्धव ठाकरे असणार उपस्थित

कपिल पाटील यांनी शनिवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, रविवारी एक सभा आयोजित केली आहे. नितीश कुमार यांनी भूमिका बदलल्यानंतर मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. स्वतः शरद पवार यांनी मला भेटायला बोलवले होते. नितीश कुमार हे भाजपासोबत गेले असले तरी आम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच राहमार आहोत. आमच्या अनेक बैठका पार पडल्या आहेत. धारावीत आम्ही मोठी सभा घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. धारावीतील सभेला उद्धव ठाकरे उपस्थित असतील. जे भाजपाविरोधक आहेत, ते आम्हाला पाठिंबा देतील, अशी भूमिका कपिल पाटील यांनी स्पष्ट केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha 2024: …तर देशात असंतोष भडकेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

कपिल पाटील सलग 3 वेळा विधान परिषदेत

दरम्यान, कपिल पाटील हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील एकमेव समाजवादी आमदार आहेत. इतकचं नाही तर ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी ट्रस्टीदेखील आहेत. समाजवादी नेता बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर समाजवादी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान देण्यात आला आहे. कपिल पाटील सलग 3 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिक्षण आणि शिक्षकांच्या अधिकारांसाठी ते विधान परिषदेत नेहमी आवाज उठवताना दिसतात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे ओबीसी आणि मंडल आयोग आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -