Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthडेंटल फ्लॉस वापरता का? जाणून घ्या तोटे

डेंटल फ्लॉस वापरता का? जाणून घ्या तोटे

Subscribe

जर तुमचे दात स्वच्छ असतील तर तुमची स्माईलही तितकीच खुलून येते. त्यामुळे दात स्वच्छ करणे महत्वाचे असते. मौखिक आरोग्य केवळ दातांना किडण्यापासून वाचवते असे नाही तर संपूर्ण आरोग्याला याचा फायदा होतो. त्यामुळे अनेक जण दातांचे आरोग्य राखण्यासाठी डेंटल फ्लॉसचा वापर करतात. डेंटल फ्लॉस केल्याने दातांमधील अडकलेले अन्न सहज काढता येते. मात्र, असे असले तरी डेंटल फ्लॉसचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डेंटल फ्लॉस वापरण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.

डेंटल फ्लॉस म्हणजे काय?

- Advertisement -

डेंटल फ्लॉस हा अतिशयक पातळ असा सिंथेटिक धागा आहे. ज्याच्या साहाय्याने दातांमध्ये अडकलेली घाण सहजरित्या काढता येते. अनेक वेळा आपण खाल्लेले अन्नपदार्थ दातांमध्ये अडकते. परिणामी, बॅक्टेरिया वाढतात. तोंडाला दुर्गंधी येणे, दातांना कीड लागणे अशा समस्या उध्दभवतात. अशावेळी डेंटल फ्लॉस वापरल्याने दातांमध्ये प्लेक जमा होत नाही.

- Advertisement -

डेंटल फ्लॉसमुळे आरोग्यास हानी पोहोचते का?

तज्ज्ञांच्या मते, डेंटल फ्लॉसचे जसे फायदे आहेत तसे तोटेही असू शकतात. हे सर्व तुम्ही वापरत असलेल्या फ्लॉसच्या प्रकारावर पूर्णपणे अवलंबून असते. वास्तविक, काही डेंटल फ्लॉस हे विषारी केमिकल टेफ्लॉनपासून बनविले जातात. जेव्हा हे विषारी केमिकल शरीरात जाते तेव्हा थायरॉईड आणि हार्मोनल संतुलनसारख्या समस्या जाणवू शकतात. याशिवाय काही डेन्टल फ्लॉसमध्ये सुगंध देखील असतो. हा सुगंध कृत्रिम असतो. यामध्ये अनेक प्रकारची केमिकल्स असतात ज्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्ती दिवसातून अनेक वेळा डेंटल फ्लॉसचा वापर करतात. त्यांच्या हिरड्यांच्या टिशूंचे नुकसान होऊ शकते. याशिवाय दातांमधील जागाही वाढू शकते.

फ्लॉसिंगची योग्य पद्धत –

  • तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तोंडाच्या आरोग्यासाठी डेंटल फ्लॉस अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र, जेव्हा तुम्ही फ्लॉस स्टिक वापरता तेव्हा ती केमिकलमुक्त असावी.
  • डेंटल फ्लॉस करताना खूप वेगाने करू नये. असे केल्याने हिरड्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. परिणामी, दातांच्या अनेक समस्या उध्दभवतात.
  • फ्लॉसिंग करताना हलक्या हातानेच करावे.

 

 

 


हेही वाचा : साखर खाणं दातांसाठी हानिकारक?

 

- Advertisment -

Manini