घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या आमदारकीविषयी संजय राऊतांचा दावा, म्हणाले - "कायद्याने वागले तर..."

अजित पवारांच्या आमदारकीविषयी संजय राऊतांचा दावा, म्हणाले – “कायद्याने वागले तर…”

Subscribe

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारकीविषयी खळबळजनक दावा केला आहे. अजित पवारांचे ही मुख्यमंत्री पद जाणार असे विधान राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात असलेल्या तीन चाकी सरकारमध्ये सध्या मोठे नाराजी नाट्य सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी न लावल्याने ते आणखी स्पष्टपणे जाणवून आले. ज्यानंतर काल (ता. 04 ऑक्टोबर) राज्य सरकारने अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा दिली आहे. अजित पवार यांनी सुद्धा बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पाडण्याचे काम केले आहे. ज्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी ही दोन गटांत विभागली गेली. परंतु, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारकीविषयी खळबळजनक दावा केला आहे. अजित पवारांचे ही मुख्यमंत्री पद जाणार असे विधान राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे. (Sanjay Raut’s claim about Ajit Pawar’s MLA)

हेही वाचा – आता सरकारविरुद्ध लिहिणे-बोलणे हा देशद्रोह…, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

आज (ता. 05 ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी कायम राहणार असून अजित पवार यांना जर मुख्यमंत्री केले तर त्यांनाही पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले होते. त्यांच्या या विधानावर राऊतांनी मत व्यक्त करत म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे स्वतःचा अपमान स्वतः करत आहे. ज्याप्रमाणे दिल्लीने त्यांचे मातेरे आणि पोतेरे केले आहे, त्याची आम्हाला लाज वाटते. त्यांची आता दया येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस राजकारणात मी केव्हाही पाहिला नाही, हे दुर्दैवाने मला म्हणावे लागत आहे.

तसेच, एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. पाच वर्ष काय पण जर का कोर्टाने आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांनी मनात आणले की कायद्याने वागायचे आहे तर ते पाच मिनिटं सुद्धा पदावर राहू शकत नाही. ते बेकायदेशीरपणे बसवलेले मुख्यमंत्री आहेत. तर अजित पवार यांची सुद्धा आमदारकी जाणार आहे. जर ते कायद्याने आणि घटनेने वागणार असतील तर. 2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय बसणार असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे,.

- Advertisement -

तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला देखील संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात राहुल नार्वेकर यांच्यासारखे बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष झालेले नाहीत. त्यांनी कायद्याच्या गोष्टी करू नये, त्यांनी कायद्याविषयी बोलणे हा घटनेचा अपमान आहे. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, वकिल आहेत. त्यांनी कायद्याची भाषा करणे हा या देशातील कायदा आणि संविधानाचा अपमान आहे, असा टोला संजय राऊत यांच्याकडून लगावण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -