घरमुंबईधनदांडग्यांची पसंती 'सी फेसिंग'च्या घरांना, प्रतिचौरस फुटासाठी मोजले जातायत दीड लाख रुपये

धनदांडग्यांची पसंती ‘सी फेसिंग’च्या घरांना, प्रतिचौरस फुटासाठी मोजले जातायत दीड लाख रुपये

Subscribe

मुंबईत येणाऱ्या आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये मुंबईत 'सी फेसिंग' म्हणजेच दारे, खिडक्या या सगळ्यांची तोंडं समुद्राच्या दिशेने असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा टप्पा या आलिशान घरांच्या विक्रीने ओलांडला आहे.

मुंबई : स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईमध्ये किमान छोटे तरी पण हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण प्रत्येकालाच मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण भाडे तत्त्वावर मुंबईत वास्तव्य करतात. मुंबईचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या शहराला लाभलेला विस्तृत असा समुद्रकिनारा. या समुद्रकिनारी घर असणारे लोक म्हणजे सर्वाधिक सुखी लोक आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे मुंबईच्या समुद्रकिनारी आपले पण घर असावे, असे मुंबईत येणाऱ्या आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. गेल्या नऊ महिन्यांमध्ये मुंबईत ‘सी फेसिंग’ म्हणजेच दारे, खिडक्या या सगळ्यांची तोंडं समुद्राच्या दिशेने असलेल्या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा टप्पा या आलिशान घरांच्या विक्रीने ओलांडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सी फेसिंगच्या घरांसाठी धनदांडग्यांकडून प्रतिचौरस फुटांसाठी तब्बल दीड लाख रुपये मोजले जात आहेत. (Sea facing houses, preferred by the wealthy, are priced at Rs 1.5 lakh per square foot)

हेही वाचा – वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांची सुरक्षा महागली!; सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा

- Advertisement -

सी फेसिंगच्या घरांची मागणी ही खासगी कंपन्यांचे मालक, बॉलीवूडमधील कलाकार आणि मोठे उद्योगपती यांच्याकडून सर्वाधिक करण्यात येत आहे. ज्यांना समुद्रकिनारी घर हवे आहे, असे लोक हवी तितकी किंमत मोजायला तयार आहेत. नुकतेच, दक्षिण मुंबईतील एका आलिशान इमारतीत घरासाठीचा सर्वात मोठा व्यवहार करण्यात आला. एका वित्तीय संस्थेमध्ये संचालक असलेल्या एका महिलेने 263 कोटी रुपयांमध्ये तीन फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यांतील एक फ्लॅट 24 व्या, तर अन्य दोन फ्लॅट ही 25 व्या मजल्यावर आहेत. हे तिन्ही फ्लॅट एकूण 9 हजार 719 चौरस फुट आहेत.

तर, प्लास्टिक उद्योगातील एका उद्योगपतीने दक्षिण मुंबईतील एका आलिशान इमारतीत 16 ते 21 मजले म्हणजे एकूण पाच मजले हे 144 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तर, आणखी एका उद्योजकाने दक्षिण मुंबईतीलच एका इमारतीमध्ये 29, 30 व 31 अशा तीन मजल्यांची खरेदी 252 कोटी 50 लाख रुपयांना केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या घराने मुंबईतील सर्वात सुंदर आणि अलिशान घर असा लौकिक कमावला आहे. तसेच, दक्षिण मुंबईमध्ये एका उद्योजकाने तीन मजल्यांची खरेदी केली. या तिन्ही मजल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही मजल्यांच्या सर्व खोल्यांमधून समुद्र पाहायला मिळतो. अशाच पद्धतीने या घरांची रचना करण्यात आली आहे.

- Advertisement -

दक्षिण मुंबईतून मुंबईचा समुद्र सर्वांत देखणा आणि सुंदर दिसतो. त्यामुळे तिथल्या परिसरात 1960 च्या दशकांपासून बांधल्या गेलेल्या इमारतींनी समुद्राचे दृश्य हा घरांच्या विक्रीचा प्राधान्य मुद्दा ठेवला होता. हेच आकर्षण आजही कायम आहे. ज्यामुळे दक्षिण मुंबईतील घरांच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. शेकडो कोटी रुपयांच्या आलिशान गृहविक्रीत दक्षिण मुंबईचा वाटा हा 48 टक्के असून उच्चभ्रू ग्राहकांनी वरळीला पसंती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -