घरदेश-विदेशकदाचित निवडणुकीपर्यंत ED तुमच्यावरही कारवाई करू शकते; अरविंद केजरीवालांचे सूचक विधान

कदाचित निवडणुकीपर्यंत ED तुमच्यावरही कारवाई करू शकते; अरविंद केजरीवालांचे सूचक विधान

Subscribe

निवडणुका जवळ आल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांना या निवडणुकीत पराजयाची भिती वाटत आहे. त्यातूनच संजय सिंगच्या घरावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूजक्लिकच्या संपादकावर ईडीने केलेल्या कारवाईचा संदर्भ संजय सिंह यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई प्रकरणी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, कदाचित आगामी निवडणुकीपर्यंत हे कुणावरही कारवाई करू शकतात तेव्हा सावध राहण्याची गरज आहे असे सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केले. (Maybe the ED can take action against you too till the election Arvind Kejriwals Indicative Statement)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (3 ऑक्टोबर) कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीने छापा टाकून केलेल्या कारवाई संदर्भात म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून आपण पाहत आहोत की, तथाकथित दारू घोटाळ्याबद्दल खूप गदारोळ होत आहे. याप्रकरणी आतापर्यंत हजाराहून अधिक छापे टाकण्यात आले असले तरी अद्याप एक पैसाही जप्त झालेला नाही. भाजपवाले फक्त घोटाळ्याचे आरोप करत राहतात असेही वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपने खूप चौकशी केली पण काहीही सापडले नाही. संजय सिंगच्या घरातूनही तपास यंत्रणेला काहीही मिळणार नाही असेही वक्तव्य केजरीवाल यांनी केले.

- Advertisement -

निवडणुकीतील पराभवाच्या भितीने कारवाया

केंद्र सरकारवर हल्ला करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांना या निवडणुकीत पराजयाची भिती वाटत आहे. त्यातूनच संजय सिंगच्या घरावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. तर न्यूजक्लिक प्रकरणातील छाप्यांचा संदर्भ देताना, केजरीवाल म्हणाले की, काल पत्रकारांवर कारवाई झाली आणि आज आज संजय सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता फक्त निवडणुकीपर्यंत थांबा, कदाचित तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ शकते असाही उपरोधिक टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला.

हेही वाचा : खासदारकीबाबत रोहित पवार थेटच बोलले; म्हणाले- ‘मला विधिमंडळातच काम करायचे आहे’

- Advertisement -

आपचे नेते संजय सिंह यांच्यावर ईडीच्या कारवाई

बुधवारी (3 ऑक्टोबर) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक आप खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहोचले होते. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीचे अधिकारी संजय सिंह यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी आप नेत्याची बराच वेळ चौकशी केली. घराबाहेर फिरत असलेल्या त्यांच्या वडिलांनाही आत बोलावण्यात आले. ईडीच्या याच कारवाईमुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा : राज्याचे मुख्यमंत्री बदलणार? अजितदादांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू; फडणवीसांचं मोठं विधान

काय आहे मद्य धोरण घोटाळा प्रकरण?

केजरीवाल सरकारने 2021 मध्ये नवीन मद्य धोरण लागू केले. या धोरणांतर्गत दारू व्यवसाय खासगी व्यापाऱ्याकडे देऊन माफिया राजवट संपविण्याची भाषा सरकारने केली. नव्या धोरणामुळे महसूलही वाढेल, असा दावा केला जात होता. मात्र नवीन दारू धोरण लागू झाल्यानंतर महसूल वाढण्याऐवजी कमी होऊ लागला, त्यानंतर दिल्ली सरकारवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यानंतर मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नवीन धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, राज्यपालांनी 22 जुलै 2022 रोजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर या प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ईडीने ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -