घरक्रीडाAsian Game : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दक्षिण कोरियावर हल्लाबोल; स्वप्नपूर्तीसाठी एका...

Asian Game : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दक्षिण कोरियावर हल्लाबोल; स्वप्नपूर्तीसाठी एका विजयाची गरज

Subscribe

Asian Game : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने दमदार कामगिरी करताना 6 सामन्यात 63 गोल्सचा पाऊस पाडत अंतिम सामन्यात प्रवेशे केला आहे. भारतीय संघ तब्बल 9 वर्षानंतर आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला असून भारताला आता सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. भारतासमोर चीन किंवा जपान यांच्यापैकी एका संघाचे आव्हान असणार आहे. (Asian Game Indian mens hockey team attack South Korea A win is needed to fulfill a dream)

हेही वाचा – विश्वचषकापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा सचिनच्या हातात दिसणार ट्रॉफी

- Advertisement -

भारताने पहिल्या क्वार्टरमध्येच हार्दिक सिंग (पाचव्या मिनिटाला), मनदीप सिंगने (11 व्या मिनिटाला) आणि ललित उपाध्यायने (15 व्या मिनिटाला) गोल करत दक्षिण कोरियावर हल्लाबोल केला होता. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाच्या माने जुंगने 17व्या आणि 20व्या मिनिटाला दोन गोल करत भारतीय कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. 24व्या मिनिटाला अमित रोहिदासने गोल केल्यावर भारतीयांनी पलटवार करत आघाडी घेतली.

- Advertisement -

दरम्यान, 47व्या मिनिटाला माने जुंगने पुन्हा कोरियासाठी गोल केला. मात्र उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेकने 54व्या मिनिटाला भारतासाठी गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. 7 ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना चीन किंवा जपानशी होणार आहे. भारतीय हॉकी संघ शेवटचा 2014 इंचॉन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. 2018 मध्ये जकार्ता येथे गेल्यावेळी भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र आता भारतीय संघाने रौप्य पदक निश्चित केले असून सुवर्णपदक जिंकण्याची भारताला संधी आहे.

हेही वाचा – PAK vs AUS: सराव सामन्यातच पाकिस्तानच्या फिल्डिंगचे तीन तेरा; व्हिडीओ पाहून म्हणाल, गल्ली क्रिकेट परवडलं

आशियाई गेममध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी

भारतीय संघाने साखळी फेरीच्या पाच सामन्यांमध्ये 58 गोल करताना विरोधी संघाला फक्त पाच गोल करण्याची संधी दिली. भारतीय संघाने उझबेकिस्तानचा 16-0, सिंगापूरचा 16-1, पाकिस्तानचा 10-2 आणि जपानचा 4-2 ने पराभव केला होता. भारतीय संघाने आता दक्षिण कोरियाचा परभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -