Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : भावासाठी अशा राख्या कधीही घेऊ नका

Raksha Bandhan 2023 : भावासाठी अशा राख्या कधीही घेऊ नका

Subscribe

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्याची कामना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षन करेन असं वचन देतो, तसेच बहिणीची आवडती वस्तू भेट म्हणून देतो. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक आणि भद्रा निर्माण होत आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरा केला जाईल.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

या वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला दिवसभर भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर ते 31 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

भावासाठी चुकूनही घेऊ नका अशी राखी

- Advertisement -

Significance of Rakhi Thali | राखी की थाली का महत्व | Rakshabandhan Ki  Thali Me Kya Rakhen | rakshabandhan 2022 significance of rakhi thali |  HerZindagi

  • रक्षाबंधन सुरू होण्याआधी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. मात्र भावासाठी राखी घेताना विशेष काळजी घ्या.
  • राखी विकत घेताना कधीही काळ्या किंवा निळ्या रंगाची राखी घेऊ नका, कारण यामुळे खूप नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.
  • राखी कधीही खूप मोठ्या आकाराची सुद्धा घेऊ नये.कारण ही कधीही तुटू शकते, जे अशुभ समजले जाते.
  • राखी विकत घेताना राखीचा रंग लाल, केशरी, पिवळा, पांढरा, गुलाबी, हिरवा असावा. तसेच ती लहान आकाराची आणि आकर्षक असावी.
  • तसेच राखीवर स्वास्तिक, ओम अशी चिन्ह असणं देखील शुभ मानलं जातं.
  • कार्टून चे चित्र असणारी राखी भावाला बांधू नये.
  • तुम्ही तुमच्या भावाला चांदीची राखी सुद्धा बांधू शकता.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना ‘हा’ मंत्र म्हटल्याने; भावाला लाभेल दीर्घायुष्य

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini