घरदेश-विदेशChandrayaan - 3 : इस्रोसह नासाचेही 'चांद्रयान-3'च्या मोहिमेकडे लक्ष; कव्हरेजबाहेर गेल्यास 'हा'...

Chandrayaan – 3 : इस्रोसह नासाचेही ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेकडे लक्ष; कव्हरेजबाहेर गेल्यास ‘हा’ देशही करणार मदत

Subscribe

Chandrayaan – 3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान-3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केले तर, भारत असा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. चंद्रयान-2 आणि तीन दिवसांपूर्वीच रशियाच्या लुना 25 च्या अपयशानंतर इस्रो शास्त्रज्ञ चांद्रयान-3 कडे लक्ष ठेवून आहेत. इस्रोला अमेरिकन स्पेस एजन्सी नासासह (NASA) युरोपियन स्पेस संस्था (ESA) मदत करणा आहे. (Chandrayaan 3 ISRO and NASA also focus on Chandrayaan 3 mission If you go out of coverage this country will also help)

‘चांद्रयान 3’ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून जगातील अनेक देश ‘इस्रो’च्या अंतराळ मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. भारताचे स्पेस नेटवर्क जसे बेंगळुरूमध्ये आहे, तशाच प्रकारचे नेटवर्क केंद्र विकसित देशांमध्येही बांधले गेले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमधील केंद्रांवरून चांद्रयानच्या लँडिंगवर लक्ष ठेवले जात आहे. नासाचे मोठे अंतराळ नेटवर्क असून त्यांनी मोठे रेडिओ अँटेना चांद्रयान-3कडे वळवले आहेत. याशिवाय युरोपियन स्पेस एजन्सीचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय उपग्रह ट्रॅकिंग नेटवर्क म्हणजेच ASTRAC आहे. जे त्यांच्या कक्षेमधील उपग्रह आणि जर्मनीतील डार्मस्टॅडमधील युरोपियन स्पेस ऑपरेशन्स सेंटर दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करते. कोर ASTRAC नेटवर्कमध्ये सात देशांची सात स्थानके आहेत. उपग्रह किंवा यान अँटेनाच्या कव्हरेजबाहेर गेले तर या दोन संस्थांकडून मदत केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…

NASA आणि ASTRAC लँडर विक्रम आणि चंद्रयानाचा डेटा भारताला पाठवणार   

चांद्रयान-3 इस्रो अँटेनाच्या कव्हरेजबाहेर गेले तर NASA आणि ASTRAC कडून लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी मदत करणार आहेत. NASA आणि ASTRAC चांद्रयान-3 च्या ऑपरेशन्समध्ये सपोर्ट करतील आणि रोव्हरचा डेटा सुरक्षितपणे भारतातील इस्रोकडे पाठवतील. कर्नाटकातील ब्यालालू या गावात असलेल्या इस्रोच्या स्पेस ट्रॅकिंग स्टेशनला अमेरिका आणि युरोपकडून लँडर विक्रम आणि चंद्रयानाचा डेटा पाठविला जाणार आहे.

- Advertisement -

इस्रोकडून प्लॅन बी तयार

विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने सर्व तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्यामुळे इस्रोकडून सतत निरीक्षण केले जात आहे. आतापर्यंत सर्व काही योजनेनुसार सुरू आहे. विक्रम लँडरचे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत. परंतु काही कारणास्तव आज यशस्वी लँडिंग शक्य झाले नाही तर, इस्रोने प्लॅन बी तयार केला आहे. प्लॅन बीनुसार इस्रो येत्या 27 ऑगस्टला चांद्रयान-3 चे लँडिंग करेल.

हेही वाचा – Mizoram Railway Bridge Collapsed : 17 जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

4 टप्प्यांत पूर्ण होणार लँडिंग 

विक्रम लँडरचे लँडिंग 4 टप्प्यात होणार असून लँडरचा वेग कमी करून ते चंद्राच्या पृष्ठभागावर आणले जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात लँडरचा 30 किमीवरून 7.5 किमी उंचीवर येईल. दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडर 7.5 किमी ते 6.8 किमी उंचीवर येईल. तिसऱ्या टप्प्यात 6.8 किमी ते 800 मीटर उंचीवर येईल. चौथ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर 800 मीटर उंचीवर 150 मीटर उंचीपर्यंत येईल.

शेवटची 15 मिनिटे का महत्त्वाची?

अंतराळ तज्ज्ञ प्रोफेसर आरसी कपूर यांनी सांगितले की, चंद्रावर विक्रम लँडरच्या लँडिंगची शेवटची 15 मिनिटे खूप महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयान-3 जेव्हा पहिल्या टप्प्यात उतरण्यास सुरुवात करेल, तेव्हा त्याचा वेग 1683 मीटर प्रती सेकंद असेल. यानंतर ते 7.4 किमी उंचीपर्यंत खाली आणले जाईल. त्यानंतर लँडरचा वेग 375 मीटर प्रती सेकंद इतका कमी करण्यात येईल. याठिकाणी विक्रम लँडरची उंची निश्चित केली जाईल म्हणजेच ते चंद्राच्या पृष्ठभागावर झुकले जाईल. त्यानंतर विक्रम लँडर 1300 मीटर उंचीवर आणले जाईल. त्यानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्याचा वेग हळूहळू कमी होईल, नंतर ते 400 मीटर, 150 मीटर आणि नंतर 50 मीटरपर्यंत आणले जाईल. शेवटी 10 मीटरवर आल्यानंतर अंतिम लँडिंग केले जाईल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्थ करेल तेव्हा विक्रम लँडरचा वेग 2 मीटर प्रती सेकंद इतका असेल, अशी माहिती आरसी कपूर यांनी दिली.

हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार चांद्रयान-3चे लँडिंग

चांद्रयान-3 चे विक्रम लँडरचे लँडिंग चंद्राच्या सर्वात धोकादायक ठिकाणी होणार आहे. नासाच्या माहितीनुसार, चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्य, विज्ञान आणि कुतूहलाने भरलेला आहे. त्यामुळे चांद्रयान-3 चे लँडिंगनंतर संपूर्ण जगाला इतिहास घडताना पाहायचा आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप खोल खड्डे आहेत. कोट्यवधी वर्षांपासून या भागात सूर्यप्रकाश पोहोचलेला नाही. येथील तापमान उणे 248 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग गरम करण्यासाठी वातावरण नाही. त्यामुळे इस्रोकडून घाईघाईने पावले उचलली जात आहेत. चांद्रयान-2 दरम्यान झालेली चूक पुन्हा होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -