घरमहाराष्ट्रनाशिकखुशखबर! पेसा क्षेत्रातील 'झेडपी'च्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

खुशखबर! पेसा क्षेत्रातील ‘झेडपी’च्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

Subscribe

नाशिक : अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत 3 एप्रिल 2023 च्या शासन आदेशानूसार वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगांव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांस भरतीस परवागनी देण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त शासन आदेशानूसार जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपूरी, बागलाण, देवळा या तालुक्यातील पेसा क्षेत्रातील उमेदवारांची तत्काळ प्रभावाने पदभरती सुरु करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये साधारणत: 450 पदसंख्या असून याच्या 80 टक़्के म्हणजेच 360 जागा भरण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

पवित्र प्रणालीमार्फत अनुसूचित जमाती-पेसामधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, पुणे या कार्यालयाकडून पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार शासनाचे पत्र दि.१०.०८.२०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरीता कार्यवाहीस मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय दि.०१.०२.२०२३ मधील अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत जिल्ह्यांच्या प्रमुखांनी कार्यवाही करण्याची तरतुद आहे. यानुसार टेट-2022 परीक्षा दिलेल्या एसटी-पेसा उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही चाचणी (टेट-2022) परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून पेसा क्षेत्रातील यादीनूसार गुणवत्तेप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची निवड करावी असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील पदभरती तत्काळ करण्याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झाले असून त्यानूसार रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समिती पूर्ण यादीचा आढावा घेणार आहे. यासाठी स्वतंत्र पेसा भरती कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून शासन आदेशानूसार पदभरती कार्यवाहीस तत्काळ सुरुवात करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत 7 तालुक्यांमधून माहिती मागविण्यात येणार असून पुढील 8 ते 10 दिवसांत तत्काळ पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. : आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत घेण्यात आलेल्या टेट-2022 मधील उत्तीर्ण उमेदवारांची यादी शासनाकडून प्राप्त होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानूसार जिल्हा परिषदेत पेसा भरती कक्ष स्थापन करण्यात आला असून टेट-2022 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राप्त होताच ज्येष्ठतेनूसार गुणवत्ताधारक पेसा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. : नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -