Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousRaksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला का साजरे केले जाते रक्षाबंधन?

Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला का साजरे केले जाते रक्षाबंधन?

Subscribe

रक्षाबंधनचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा वेगळेपण सांगणारा हा सण प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खास असतो. पण रक्षाबंधन का आणि सर्वात आधी कोणी साजरी केली हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

श्रावण पौर्णिमेला का साजरी केले जाते रक्षाबंधन?

The Raksha Bandhan (or Rakhi) Festival

- Advertisement -

पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू राजा बळीसोबत पाताळ लोकात राहायला गेले तेव्हा देवी लक्ष्मीला काळजी वाटली. आपल्या पतीला परत आणण्यासाठी नारमुनींनी देवी लक्ष्मीला राखी बांधून राजा बळीला तुझा भाऊ बनवण्यास सांगितले आणि भगवान विष्णूला वरदान मागितले. देवी लक्ष्मीने वेश धारण करून राजा बळीला राखी बांधली आणि विष्णूचा शोध घेतला. योगायोगाने त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून भावा-बहिणीचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला जाऊ लागला, असे मानले जाते. या सणाची सुरुवात देवी लक्ष्मीने सर्वप्रथम राखी बांधून केली होती.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

The Trend of Women Tying Rakhis to Their Sisters-In-Law Catching Up

- Advertisement -

30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:59 पासून श्रावण शुक्ल पौर्णिमा सुरू होईल. श्रावण पौर्णिमेसोबतच भद्रा काळ देखील सुरु होईल. जो 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 वाजता समाप्त होईल. त्यानंतर शुभ मुहूर्त सुरू होईल.

त्यामुळे 30 ऑगस्ट 2023 रोजी राखी बांधायची असेल तर रात्री 9.15 नंतरच बांधावी. तसेच तुम्ही 31 ऑगस्टला देखील रक्षाबंधन साजरी करु शकता. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

 


हेही वाचा :

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला 700 वर्षानंतर पंच महायोग; राखी बांधताना करु नका ‘या’ चूका

- Advertisment -

Manini