Thursday, June 8, 2023
घर मानिनी Religious Vastu Tips : स्वयंपाकघरातील 'या' 5 गोष्टी कधीही संपवू नये

Vastu Tips : स्वयंपाकघरातील ‘या’ 5 गोष्टी कधीही संपवू नये

Subscribe

वास्तु शास्त्रात स्वयंपाक घराला पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे असे मानले जाते की, स्वयंपाक घरातील काही गोष्टींचा कधीही तुटवडा पडून देऊ नये. नाहीतर घराची आर्थिक परिस्थिती डगमगू शकते.

आपल्या आसपासच्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. खास करून घर, ऑफिस आणि दुकान या ठिकाणची वास्तू आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकते. तुमच्या आयुष्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून तुम्ही आजचं या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. खरंतर घरातील या गोष्टींची कमतरता असल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात. त्यामुळे घरात कधीही या गोष्टी संपू देऊ नये.

वास्तु शास्त्रात स्वयंपाकघराला पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे असे मानले जाते की, स्वयंपाक घरातील काही गोष्टींचा कधीही तुटवडा पडून देऊ नये. नाहीतर घराची आर्थिक परिस्थिती डगमगू शकते.

घरातील या 5 गोष्टी कधीही संपू देऊ नका

मीठ

- Advertisement -


मीठ जेवणाची चव वाढवते. मात्र स्वयंपाक घरातील मीठ कधीही संपू देऊ नका, किंवा संपण्याआधीच नवीन आणून ठेवा. घरातील मीठ संपल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते. तसेच मीठ नजर काढण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. शिवाय मिठामुळे घरातील राहू-केतूचे अशुभ प्रभावसुद्धा दूर होतात.

तांदूळ

- Advertisement -

South Korean rice production estimates increase | 2020-07-07 | World Grain
हिंदू धर्मात तांदळाचा वापर पूजा करण्यासाठी केला जातो, त्याला अक्षता असं म्हणतात. वास्तु शास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित धान्य आहे. असं म्हणतात की, घरातील तांदूळ संपल्यास शुक्र ग्रहाचे दोष लागतात. ज्यामुळे तुम्हाला धानाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

 हळद


तुमच्या स्वयंपाक घरातील हळद कधीही संपणार नाही, याची काळजी घ्या. आयुष्याला सुखी करण्यासाठी वास्तू शास्त्रात हळदीशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच हळद गुरू ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे घरातील हळद संपल्यास गुरू ग्रहाचा अशुभ प्रभाव तुमच्या घरावर होऊ शकतो.

पीठ


पिठाशिवाय घरात पोळा-भोकरी काहीही बनू शकत नाही. वास्तू शास्त्रानुसार पिठाचा संबंध तुमच्या आर्थिक स्थितीशी निगडित आहे. त्यामुळे घरातील पीठ कधीही संपणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी.

 तेल


स्वयंघरातील तेल संपण्याआधी नवीन आणून ठेवावे. तेलाचा संबंध शनी ग्रहाशी आहे. घरातील तेल संपल्यास शनी ग्रहाचे अशुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडू शकतात.


हेही वाचा : 

Vastu Tips : कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी लवंग आणि कापूराचे करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini