वसईच्या भजनलाल स्टुडिओमधील आग आटोक्यात; कोणतीही जीवितहानी नाही

भजनलाल स्टुडिओला लागलेल्या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई | वसईच्या कामण येथील भजनलाल स्टुडिओमध्ये (Bhajanlal Studio) भीषण आग लागली आहे. भजनलाल स्टुडिओला शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दल (Fire Brigade) आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. परंतु, भजनलाल स्टुडिओमधील आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

दरम्यान, भजनलाल स्टुडिओला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. कामन परिसरात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहेत. यात अनेक कंपनी, स्टुडिओ अनाधिकृत आहेत. या ठिकाणी संबंधित प्रशासनाच्या कोणत्याही परवानग्या नसल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे येथील कंपनी आणि स्टुडिओ मधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.