Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर दीपोत्सव Diwali 2020: जाणून घ्या यंदा कधी आहे वसूबारस, धनतेरस आणि लक्ष्मीपूजन

Diwali 2020: जाणून घ्या यंदा कधी आहे वसूबारस, धनतेरस आणि लक्ष्मीपूजन

जाणून घ्या दिवाळीचे महत्व

Related Story

- Advertisement -

भारत म्हणजे सण उत्सवांचा देश. सण साजरे करणे ही आपली परंपरा आहे. त्यातही दसऱ्या नंतर २० दिवसांनी येणाऱ्या दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. प्रभु रामचंद्र रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासीयांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून रोषणाई केली होती. रामाच्या स्वागतासाठी अवघी अयोध्यानगरी रंगीबेरंगी पानं फुलांच्या तोरणांनी सजली होती. दरवाजासमोर पणत्या लावून सुवासिनींनी रामाचे मनोभावे स्वागत केले होते. तेव्हापासूनच दिवाळीचे पर्व सुरू झाले. जे आजतागयत सुरूच आहे.

- Advertisement -

नकारात्मकेच्या अंधारात सकारात्मतेचा दिवा लावून दाही दिशा उजळवून टाकणारा हा सण. पण, दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई, रांगोळ्यांचे पर्व नसून खरेदी करण्याचेही पर्व आहे. यामुळे यास व्यापाऱ्यांचे पर्वही म्हणतात. या नवीन पर्वात कपड्यांबरोबरच, नवीन सामान, सोने, चांदी यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. कारण या दिवसात खरेदी करणे शुभ मानले जाते.

- Advertisement -

दिवाळसणात ज्या घरात वस्तूंची, धातूंची खरेदी केली जाते त्या घरात वर्षभर कसलीही कमतरता जाणवत नाही. कारण लक्ष्मी म्हणजे धन, समृद्धी आणि गुंतवणूकीची देवता. यामुळे भारतात दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी केली जाते.

वसूबारस

ग्रामीण भागात वसूबारस पासून दिवाळीची सुरुवात होते. यावर्षी वसूबारस १२ नोव्हेंबरला आला आहे.

धनतेरस

दिवाळीच्या पहील्या दिवशी धनतेरस असते. ज्याला त्रयोदशी असेही म्हटले जाते. या दिवशी लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी, भक्ती गीत, आरत्या, मंत्राचे पठण करतात. या दिवशी एक तरी लहान मोठ भांड खरेदी करतात. कारण या दिवशी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. अपमृत्यू टाळण्यासाठीही यमदीपदान केले जाते. यावर्षी १३ नोव्हेंबरला धनतेरस आहे.

नरक चतुर्दशी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी असते. या दिवशी अभ्यंगस्नान करुन पायाखाली कारेटे फोडले जाते. श्रीकृष्णाची पूजा केली जाते. कारण याच दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. भारतात विविध राज्यात नरक चतुर्दशी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काहीजण या दिवशी पहाटे उठून तेलाने स्नान करतात. नंतर महाकालिकेची कुंकू लावून पूजा केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी १४ नोव्हेंबरला आहे.

लक्ष्मीपूजन

या वर्षी लक्ष्मीपूजन देखील १४ नोव्हेंबरला आहे. या दिवशी सायंकाळी घराघरात लक्ष्मी देवीची पूजा केली जाते.

दिवाळी पाडवा

दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे. पाडवा हा साडेतीन मुहुर्तातील अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. यावर्षी पाडवा आणि भाऊबीज बलिप्रतिपदा एकाच दिवशी १६ नोव्हेंबरला आली आहे.

भाऊबीज

या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी मनोकामना करते.

बलिप्रतिपदा

या दिवशी नातेवाईक मित्रमंडळी यांना मिठाईंचे वाटप करून भेटवस्तू दिल्या जातात. या दिवशी आतिषबाजी करून लक्ष्मीचे स्वागत केले जाते.

- Advertisement -