Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthमानसिक आरोग्यासाठी फायदेशीर इको थेरेपी

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर इको थेरेपी

Subscribe

मानसिक आरोग्य बिघडल्याची काही प्रकरणे आपण पाहतो. यामागे काही कारणे असू शकतात. सर्वसामान्यपणे काम अथवा एखाद्या गोष्टींचे अधिक टेंन्शन, यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडले जाते. काही वेळेस ही स्थिती गंभीर होते. मानसिक आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम लाइफस्टाइल ते काउंसिलिंगसह काही मेडिकल ट्रिटमेंट केल्या जातात. अशातच इको थेरेपी बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?

इको थेरपी ही एक पूर्ण सीरिज असते. त्यामध्ये विविध अॅक्टिव्हिटीज केल्या जातात. जर एखाद्याला हलक्या स्वरुपात स्ट्रेस असेल तर त्याला औषधाशिवाय या थेरपीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुदृढ करण्यास प्रोत्साहन दिले जाते. डिप्रेशनसारख्या गंभीर स्थितीतून बाहेर काढण्यासाठी ही थेरपी फायदेशीर ठरते.

- Advertisement -

Ecotherapy: Nature Therapy Benefits, Types, How to Do It - Dr. Axe

या थेरपीत तुम्हाला बागकाम, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, डोंगर-दऱ्यांमध्ये ट्रेकिंगला जाणे अशा काही अॅक्टिव्हिटीज केल्या जातात. याच कारणास्तव याला ग्रीन एक्सरसाइज, ग्रीन केअर, ग्रीन थेरपी, हॉर्टिकल्चर थेरपी अशा विविध नावाने ओळखले जाते.

- Advertisement -

कसे करते काम?
धावपळीच्या आयुष्यातून ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे असते. तर इको थेरपी तुम्हाला निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यास मदत करते.यामध्ये एनिमल थेरपीमध्ये तेथील जीवांच्या जवळ राहून त्यांच्या हालचाली अनुभवता येतात. या व्यतिरिक्त नॉर्मल वॉकिंग ते अॅडवेंचर अॅक्टिव्हिटीजचा समावेश असतो. यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि तुम्ही आनंदीत होता. जे मानसिक आजारांवर लढण्यासाठी फायदेशीर ठरतात.

खरंतर इको थेरपी ही एक्सपर्ट्सच्या देखरेखीखाली केली जाते. जर तसे केले नाही तर तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. सेवानिवृत्त लोक बहुतांशवेळा स्वत:ला ऐकटे समजतात, मात्र त्यांच्यासाठी ही एक बेस्ट थेरपी आहे.


हेही वाचा- एकाग्रतेसाठी करा ‘ही’ योगासने

- Advertisment -

Manini