Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthखाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बिघडतो मूड

खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बिघडतो मूड

Subscribe

हेल्दी फूड खाल्ल्याने आपल्या शरीराला गरजेचे न्युट्रिशन्स मिळतात. मात्र जर तुम्ही योग्य डाएटचे सेवन करत नसाल तर तुम्हाला थकवा जाणवतो आणि आरोग्यासंबंधित काही समस्याही उद्भवतात. परंतु तुम्हाला माहितेय का, तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे तुमचा मूड खराब होतो. खरंतर आपण जे खातो त्याचा परिणा आपल्या फिजिकलच नव्हे तर मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावरही पडतो.

बहुतांशवेळी तुम्ही पाहिले असेल की, दीर्घकाळ काहीही खाल्ले नाहीतर चिडचिड होते. अथवा मूड बिघडला जातो. जेव्हा तुम्ही चविष्ट पदार्थ खाता तेव्हा तुमचा मूड हा नेहमीच फ्रेश असतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अधिक जाणून घेऊयात.

- Advertisement -

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीचा मूडवर होतो परिणाम
-एक्सपर्ट्सच्या मते आपले खाणे-पिणे योग्य नसेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मूडवर होऊ शकतो. याच कारणास्तव तुमच्या ब्रेनच्या हेल्थवर परिणाम होतो. मूड स्विंग्स होतात आणि इमोशन्सही प्रभावित होतात.

-जर तुम्ही रिफाइंड फूड्स जसे की, ब्रेड्स, पेस्ट्रीज, फ्रेंच फ्राइज सारख्या पदार्थांचे अत्याधिक सेवन करत असाल तर ब्लड शुगरमध्ये सातत्याने चढ-उतार होऊ शकतो. यामुळे थकवा आणि चिडचिड होऊ शकते.

- Advertisement -

-जी लोक मिल्स स्किप करतात, खासकरून नाश्ता करत नाहीत त्यांचा ब्लड शुगरसुद्धा प्रभावित होतो. यामुळे तुम्ही दिवसभर थकलेले राहता आणि कामावर फोकस करू शकत नाहीत.

-फिजिकली आणि मानसिकरित्या हेल्दी राहण्यासाठी तुम्ही बॅलेन्स मील घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही एकाच पद्धतीचे फूड खात असाल तर शरीरात न्युट्रिशनची कमतरता निर्माण होऊ शकते.

-लोह, जिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड कमी झाल्यास तुमचा मूड बिघडला जातो. त्याचसोबत काम करण्याची एनर्जीही शरीरात राहत नाही.

-जर तुम्ही कॅफेन ड्रिंक्सचे अधिक सेवन करत असाल तर तुम्हाला लगेच एनर्जी मिळू शकते. मात्र याचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास एंग्जायटी आणि झोप येण्यास अडथळा येऊ शकतो.

-डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी झाल्यास तुमचा मूड बिघडला जातो. प्रोटीनमध्ये एमिनो अॅसिड्स असतात. जे काही केमिकल्स तयार करतात. याच्या माध्यमातून मेंदूला फिलिंग्स आणि विचार कंट्रोल करण्यास मदत मिळते. याची कमतरता निर्माण झाल्यास तुमचा मूड प्रभावित होऊ शकतो.

-काही लोक इमोशलन झाल्यानंतर काहीही खातात. याचा परिणाम पुढे जाऊन तुमच्या आरोग्यावर होतो.


हेही वाचा- रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने होऊ शकते नुकसान…

- Advertisment -

Manini