घररायगडरोहा येथे मराठा समाजाचे तीन दिवसीय साखळी उपोषण

रोहा येथे मराठा समाजाचे तीन दिवसीय साखळी उपोषण

Subscribe

-बुधवार १ नोव्हेंबर रोजी  करंजाडेत आंदोलनाची ठिणगी- राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ करंजाडे परिसरात बुधवार १ नोव्हेंबर रोजी १० ते ६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात मराठा समन्वयक यांची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आयोजित केली होती.या बैठकीला गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव उपस्थित होते. यावेळी नितीन ठाकरे यांनी कार्यक्रम शांततेत पार पाडून कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेणे बाबत उपस्थितांना आवाहन केले. सदर बैठकीला मराठा समन्वय समितीचे विनोद साबळे, विनोद चव्हाण, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, पराग मोहिते, भरत जाधव, अतिश साबळे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

रोहा-: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संपुर्ण रोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज मंगळवारपासून तीन दिवसीय साखळी उपोषण (Three-day chain fast in Roha) सुरु करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा अधिकारी पदाचा राजीनामा देणारे राजेश काफरे हे देखील याच मंचावर मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या साखळी उपोषणाला रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधव, धनगर समाज नेते व अन्य विविध संघटनांनी जाहिरपणे पाठिंबा दिला आहे. या आंदोलन स्थळी लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी (Entry ban for public representatives) करण्यात आली आहे.
यावेळी जेष्ठ नेते व्ही.टी.देशमुख, अध्यक्ष आप्पा देशमुख, नितीन परब, अमित उकडे, प्रशांत देशमुख, समीर शेडगे,विनोद पाशीलकर, अंनत पाशीलकर, महेश सरदार, रोहिदास पाशीलकर, सूर्यकांत मोरे, राजेश काफरे, अजित मोरे, संदीप सावंत, मयूर पायगुडे, सूर्यकांत मोरे, निलेश शिर्के, रत्नप्रभा काफरे, प्राजक्ता चव्हाण, मयुरा मोरे, अमोल देशमुख, शशिकांत मोरे, राजेंद्र जाधव व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाने आरक्षण प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. त्यातून मराठा समाजात सरकार, लोकप्रतिनिधी विरोधात संतापाची लाट उसळत आहे. ठिकठिकाणी उपोषण, मंत्री, आमदार, खासदार यांचा ताफा उडवून जाब विचारणे, जाळपोळ, राजकीय नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -