घरthaneप्रक्रिया न करता दूषित पाणी थेट नाल्यात

प्रक्रिया न करता दूषित पाणी थेट नाल्यात

Subscribe

कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी सिध्दार्थ नगर येथील बायोगॅस प्रकल्पातुन घाण दुर्गंधीयुक्त पाणी प्रक्रिया न करता पत्रीपूल कचोरे कृष्णा नगर मार्गी सोडण्यात येत आहे. या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाने मनपाच्या मुख्यालयाच्या गेट लगत बेमुदत उपोषण सोमवारपासून सुरु केले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे ठाकरे गटाचे विभाग संघटक हरेश अंकुश इंगळे यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी यांनी कल्याण डोंबिवली आयुक्तांना निवेदन दिले होते.

बायोगॅस प्रकल्पाच्या सोडण्यात येणार्‍या घाण, दुषित पाणी पाहण्यासाठी गेलो असताना डोंबिवलीकरांच्या फिल्टर केले जाणार्‍या लिकेज पाणी नाल्यात 24 तास वाहत असताना संबंधित कंपनीचे कामगार त्या पाण्याबरोबर बायोगॅस प्रकल्पाचे घाण, दुषित पाणी सर्वसामान्य लोकवस्ती पत्रीपूल, हनुमानगर गटारमार्गे रोज सोडले जाते. तसेच हे दूषित पाणी सोडण्यात आल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी 12 महिने पाण्याचा उगम स्त्रोत असणारी पाणथळामध्ये मिसळले जाते, त्यातून पिण्याचे पाणीही दूषित होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -