Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipमित्रपरिवारासोबत वेळ घालवल्याने होतात आरोग्यादायी फायदे

मित्रपरिवारासोबत वेळ घालवल्याने होतात आरोग्यादायी फायदे

Subscribe

आयुष्यात मित्रपरिवार असणे फार महत्त्वाचे असते. तुम्ही त्यांच्यासोबत काही आनंदाचे, दु:खाचे क्षण मोकळणेपणाने घालवू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतो जो पार्टनरपेक्षा ही अधिक महत्त्वाचा असतो. त्याच्यासोबतचे नाते शारिरीक आणि मानसिक रुपात ही उत्तम असते. अशातच मित्रपरिवारासोबत वेळ घालवल्याने काही आरोग्यदायी फायदे सुद्धा होतात. (Benefits of friendship)

- Advertisement -

एका संशोधनातून असे समोर आले की, आयुष्यात मित्रपरिवार असल्याने आयुष्यात आनंद येतो. तसेच एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी ही प्रोत्साहित करतात. जेव्हा मित्रपरिवाला तुम्ही भेटता तेव्हा तुमच्यातील नैराश्य दूर होते. आठवड्यातून एकापेक्षा अधिक वेळा तुम्ही मित्रपरिवाराच्या संगतीत वेळ घालवल्यास तुम्ही आनंदी राहता. मैत्री ही तणाव आणि चिंता दूर करण्यास फार कामी येते.

मित्रपरिवार असेल तर तुमच्यातील एकटेपणाची भावना सुद्धा दूर होते. एकटेपणामुळे नैराश्य वाढले जाते आणि अन्य मानसिक आणि शारिरीक समस्या होऊ लागतात. एका अभ्यासानुसार मैत्रीच्या भावनेमुळे आत्मियतेची भावना वाढते. तसेच मित्रपरिवारासोबत मिळून व्यायाम केल्याने ही फायदे होतात. एका रिपोर्ट्सनुसार, जी मित्रमंडळी एकत्रित एक्सरसाइज करतात त्यांच्यामध्ये तणाचा स्तर कमी दिसतो.

- Advertisement -

या व्यतिरिक्त आयुष्यात अनेक चढउतार येतात. जसे की, नोकरी जाणे, पारिवारिक समस्या, आर्थिक टेंन्शन. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी मैत्री फार कामी येते. ज्या व्यक्तीचे सच्चे मित्र असतात त्यांच्यासाठी आयुष्यातील प्रत्येक आव्हाने स्विकारण्याची ताकद असते.


हेही वाचा- शेजाऱ्यांसोबत नातेसंबंध उत्तम करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini