Tuesday, April 16, 2024
घरमानिनीHealthसेक्सनंतर bleeding , तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

सेक्सनंतर bleeding , तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

सेक्स केल्यानंतर सामान्य रुपात शारिरीक द्रव पदार्थांचा वापर केला होता. मात्र रक्त हे द्रव पदार्थांमध्ये मोडले जात नाही. सेक्स नंतर योनितून रक्तस्राव किंवा स्पॉटिंग ज्याला वैद्यकिय रुपात पोस्टकोटल ब्लीडिंगच्या रुपात ओळखले जाते. मात्र सर्वसामान्यपणे ही एखादी वैद्यकितय आपत्कालीन स्थिती नाही. परंतु अशी काही कारणे आहेत त्याच्या माध्यमातून सेक्स केल्यानंतर योनितून रक्त येऊ शकते. सेक्स केल्यानंतर स्पॉटिंग एकदा किंवा असमान्य वेळी झाल्यास तर अधिक चिंता करण्याची गरज नही. मात्र सेक्स केल्यानंतर रक्तस्राव अधिक वेळा होत असेल तर डॉक्टरांना जरुर भेटा.

-वजाइना ड्राय असणे
तज्ञ असे म्हणतात की, काही प्रकरणांमध्ये सेक्स केल्यानंतर ब्लीडिंग हे योनि ड्राय असल्यामुळे होऊ शकते. यावेळी योनित योग्य प्रमाणात लुबची कमतरता निर्माण झाल्याने असे होते. त्यामुळे सेक्स दरम्यान घर्षण आणि जळजळ होऊ शकते. अशातच रक्तस्राव होऊ शकतो.

- Advertisement -

योनित ड्रायनेस बहुतांशवेळा हार्मोनल परिवर्तनाचे कारण असू शकते. खासकरुन मेनोपॉज दरम्यान, जेव्हा एस्ट्रोजनेचा स्तर कमी होतो.

सेक्सुअली ट्रांसमिटेड डिजीज
सेक्सुअली ट्रांसमिटेड डिजीज सेक्सनंतर रक्तस्रावचे कारण ठरु शकते. खासकरुन जर संक्रमणामुळे गर्भाशय ग्रीवा मध्ये सूज आली तर त्याला सर्विसाइटिस असे म्हटले जाते.

- Advertisement -

क्लॅमाइडिया, गोनोरिया, ट्राइकोमोनिएसिस आणि हर्पीस जसे एसटीआय सर्विसाइटिसचे सुद्धा कारण ठरु शकते. यामुळे जर तुम्हाला यापैकी एक एसटीआय आहे तर सेक्स केल्याने गर्भाशय ग्रीवा, तुमची योनि कॅनास आणि गर्भाशयादरम्यानच्या क्षेत्रात जळजळ निर्माण होऊ शकते आणि रक्तस्रावचे सुद्धा कारण ठरु शकते.

बॅक्टेरियल वेजिनोसिस किंवा यीस्ट संक्रमण
कोणत्याही प्रकारचे संक्रमण सूज आणि जळजळ निर्माण करु शकते. त्याचमुळे रक्तस्राव होऊ शकते. बॅक्टेरियल वेजिनोसिस, जे बॅक्टेरियाच्या अत्याधिक वृद्धीचे कारण ठरते. ते 15 ते 44 वर्षातील लोकांमध्ये सर्वात सामान्य योनि संक्रमण असल्याचे मानले जाते.


हेही वाचा-इंटीमेट एरियासाठी Lightening Cream वापरताय? आधी हे वाचा

- Advertisment -

Manini