घरमुंबईमुंबईकरांना काही सांगायची गरज नाही..., अंबादास दानवे यांचा भाजपाला टोला

मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही…, अंबादास दानवे यांचा भाजपाला टोला

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यावरून भाजपा आणि ठाकरे गटात आता शब्दरण रंगले आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी यांनी केली आहे. तर, मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही, असे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

- Advertisement -

मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रतगती मार्ग राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे त्यांची डागडुजी आणि देखभाल पालिकाच करीत आहे. असे असले तरी, या मार्गावरील टोल व जाहिरातींचा महसूल रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जमा करीत आहे. अशा प्रकारे मालमत्ता कर व टोल असा दुहेरी भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागत आहे. त्यामुळे हे दोन टोलनाके बंद करण्याची मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल, सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा – मुंबई कमजोर पडावी यासाठी हे ‘शेठ मंडळ’… ठाकरे गटाची अमित शहांवर कडाडून टीका

- Advertisement -

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवरून मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या 25 वर्षांच्या कारभारावर टीका केली आहे. रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली, झाड पडून काहीजण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज (आदित्य ठाकरे) म्हणाले नव्हते की, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा… म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

त्यांच्या ट्वीटला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवरूनच प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांना काय तो साक्षात्कार झाला आहे! शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेच्या बाकांवर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होता का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही, असे सांगतानाच, मुंबई कोण लुटत आहे, हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -