घरक्रीडाIND vs ENG : हैदराबाद कसोटी सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज...

IND vs ENG : हैदराबाद कसोटी सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले

Subscribe

हैदराबाद : भारत वि. इंग्लंडच्या कसोटी सामन्याला कालपासून (ता. 25 जानेवारी) सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाचा पहिला डाव हा 246 धावांमध्ये संपुष्टात आला. भारताकडे असलेल्या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. भारताच्या फिरकी गोलंदाजांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते, त्यानुसार भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपले काम चोखपणे पार पडले. इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत परतल्यानंतर यशस्वी जायस्वाल याच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने दिवसअखेर एक बाद 119 धावा केल्या आहे. (England’s batsmen thrashed India’s spinners in the Hyderabad Test match)

हेही वाचा… IND Vs ENG: सामना सुरू असताना चाहता विराटची जर्सी घालून मैदानात घुसला, अन् पायाला…, VIDEO व्हायरल

- Advertisement -

हैदराबाद येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचे फिरकी गोलंदाज हे आक्रमकपणे खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या संघावर भारी पडले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ भारतीय संघाने तंबूत पाठवला. यावेळी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे प्रत्येकी तीन तीन बळी घेतले. तर अक्षर पटेल याने दोघांची विकेट घेत इंग्लंडच्या संघाचा हैदराबाद कसोटीतील पहिला डाव हा 246 धावांमध्ये संपुष्टात आणला. परंतु, भारताचे फिरंकी गोलंदाज इंग्लंडच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने धडकी भरवत असतानाच इंग्लंडच्या आजी-माजी कर्णधारांनी काहीसा डाव सावरला. जो रुटने 60 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा काढल्या. ज्यामुळे इंग्लंडला 246 धावा करणे शक्य झाले.

मात्र, जो रुटची आक्रमक खेळी सुरू असतानाच जडेजाने रुटला तंबूत पाठवले. ज्यानंतर इंग्लंडचा संघ काही वेळातच माघारी परतला. यानंतर ठराविक अंतराने जाडेजा, अश्विन, अक्षर पटेल आणि बुमराह विकेट घेत राहिले. पण एका बाजूने बेन स्टोक्स लढत राहिला. अखेर 64.3 षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली. ज्यामुळे अवघ्या 246 धावा करत इंग्लंडचा संघ तंबूत जाऊन बसला. तर, बेन स्टोक्स याने 88 चेंडूत 70 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद होताच भारताकडून पहिल्या दिवशी 119 धावा केल्या आहेत.

- Advertisement -

इंग्लंडच्या संघाकडून भारताच्या फलंदाजांवर भेदक गोलंदाजीचा मारा करण्यात आला. मात्र, जयस्वालने ‘यशस्वी’ खेळी करत पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या इंग्लंडच्या बॅझबॉलला चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या डावात मुंबईकर यशस्वीने 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेस आहे. गोलंदाजांनी आपले काम चोख बचावल्यानंतर यशस्वी जायस्वालच्या शानदार खेळीमुळे भारताचे पहिल्या दिवशी कसोटी सामन्यात वर्चस्व पाहायला मिळाले. यशस्वीला कर्णधार रोहित शर्माने उत्तम साथ दिल्याने दोघांनी 12.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माला तंबूत परतावे लागले. मात्र, त्यानंतर शुभमन गिलने मैदानात येत भारताला डाव सावरला. ज्यानंतर यशस्वी आणि शुभमन या भारताच्या युवा खेळाडूंनी भारताला केवळ 127 धावांनी मागे ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -