घरमहाराष्ट्रनाना पटोलेंनाही व्हायचंय 'मुख्यमंत्री' म्हणाले, अशी इच्छा...

नाना पटोलेंनाही व्हायचंय ‘मुख्यमंत्री’ म्हणाले, अशी इच्छा…

Subscribe

नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, अशी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, असं पटोले म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाना पटोलेंनी मुख्यमंत्री पदाची इच्छा समोर आली आहे.

2019 पासून राज्यात सत्तासंघर्षाची जी काही लढाई सुरू झाली आहे. ती अद्याप संपलेली दिसत नाही. 2 जुलैला अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनीही अनेकदा मुख्यमंत्री पदाची आपली महत्वकांक्षा बोलून दाखवली आहे. तसंच, अनेक नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकत असतातच, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ( Congress leader Nana Patole want to become Chief minister said in Aurangabad )

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारूती देवस्थानात दर्शन घेतलं. सोबतच खुलताबाद शहरातील जरी जरी बक्ष या दर्ग्यावरदेखील चादर चढवली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सध्या श्रावण महिना सुरू असून हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. तर, आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही. तसंच, मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचं कोणतंही काम होत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्याठिकाणी मी दर्शनासाठी जातो. तसंच, यावेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, अशी जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, असं पटोले म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाना पटोलेंनी मुख्यमंत्री पदाची इच्छा समोर आली आहे.

- Advertisement -

सरकारवर टीकास्त्र

नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. हे बधीर आणि नालायक सरकार आहे. भय आणि भ्रष्टाचाराच्या बळावर हे सरकार आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत हे अध्यक्षांना देखील माहिती नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. आम्ही हे सगळं जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि जनतेला सगळं सांगू, असं नाना पटोले म्हणाले.

पटोलेंचा अजित पवारांना टोला

अजित पवार हे राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले. त्यावर बोलताना नाना पटोलेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. बाप हा बापच असतो, एका मुलाने गडबड केली तरी फरक पडत नाही, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: भाजपा आणि मोदी सरकारने आता कारभारावर लक्ष द्यावे, मल्लिकार्जुन खर्गे यांचा सल्ला )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -