दिवाळी सणानिमित्त प्रत्येकजण घराची साफसफाई करतात. तसेच घर विविध सजावटीच्या वस्तूंनी सजवले जाते, पण प्रत्येक दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करणे हे प्रत्येकाच जमत नाही. यावेळी नवीन वस्तू घेण्यापेक्षा घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनी घर सजवण्याचा प्रयत्न करणे चांगले ठरते. यामुळे अनावश्यक खर्चतही बचत होईल आणि तुमच्या घरालाही नवा लुक मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कमीत कमी खर्चात पण थोड्या मेहनतीने घराला नवा लूक देऊ शकता.
१) सर्वप्रथम शक्य असल्यास तुमच्या घरातील फर्निचरचे स्थान बदला, जसे की डायनिंग टेबल आणि सोफाची दिशा बदला यामुळे तुमच्या घराला एक नवीन लूक मिळेल.
२) तुम्ही आत्तापर्यंत सोफ्यावर मोठमोठ्या उशा ठेवत असाल, पण घरात लहान उशा असतील तर त्या लहान मोठ्या उश्या मॅचिंग करून ठेवू शकता.
३) अनेकदा उशा खराब झाल्या म्हणून फेकून देतो. मात्र या उश्यांपासून एक छोटा चपटा कार्पेट तयार करु शकता आणि त्याच्या किनाऱ्यावर चमकणाऱ्या पट्ट्या कापून लावा. अशाप्रकारे तुम्ही एक अलिशान कार्पेट करून तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता.
४) सुतळ किंवा धाग्यांना फुगा किंवा कोणत्याही आकारात ठेवत फेव्हिकॉलच्या मदतीने एक शोपिस तयार करता येते. हे शोपिस तुम्ही ड्रॉईंग आणि डायनिंग रूममध्ये ठेवू शकता.
५) घरात न वापरलेल्या काचेच्या ग्लासच्या मधोमध फेविकॉलच्या साहाय्याने चमकदार लेस लावा. ज्यात इलेक्ट्रॉनिक दिवा ठेवत तुम्ही दिवाळीत घर दिव्यांनी प्रकाशमय करू शकता.
६) निरुपयोगी प्लास्टिकच्या नगेट्स किंवा ट्रेवरवर साटन, बनारसी किंवा कोणतेही चमकदार कापड चिकटवत एक सुंदर ट्रे बनवता येतो, हा ट्रे तुम्ही पाहुण्यांना नाश्ता देण्यासाठी वापरू शकता.
७) काचेच्या रिकाम्या झारमध्ये रंगीबेरंगी एलईडी दिवे ठेवत ते दिवाळीनिमित्त शोपिस म्हणून हॉलमध्ये कुठेही ठेऊ शकता.
८) घराच्या साफसफाईच्या वेळी निघालेले टाकाऊ कप्स, ग्लासेस किंवा जार यांना ऑइल पेंटने अथवा कॅन्ट्रास रंगाच्या फुलांनी, पोल्का डॉट्स इत्यादींनी सजवून. ज्यात मनी प्लांट, सिंगोनियम आणि कॅक्टस यांसारख्या कमी पाण्याची गरज असलेल्या वनस्पती लावू शकता.
९ ) डायनिंग आणि सेंट्रल टेबलचे जुने कव्हर कापून त्यापासून कव्हर आणि किचन ड्रॉवरचे कव्हर बनवू शकता.
१०) डायनिंग टेबलवर नवीन कव्हरच्या ऐवजी घरात उपलब्ध असलेली एक सुंदर चादर घालून वर एक पारदर्शक कव्हर ठेवू शकता.
११) नवीन पडदे विकत घेण्याऐवजी तुमच्या निरुपयोगी साड्या मिक्स मॅच करून पडदे बनवू शकता. अशाप्रकारे पडद्यांची अदला बदल करून तुम्ही तुमच्या घराला नवा लुक देऊ शकता.