Sunday, June 4, 2023
घर मानिनी हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या 'हे' पेय

हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ पेय

Subscribe

थंड वाऱ्यामुळे त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव बनते. अशावेळी बॉडी लोशन आणि कोल्ड क्रीम लावूनही त्वचा निर्जीव दिसते. खरं तर, हिवाळ्यात त्वचेला केवळ बाह्य मॉइश्चरायझरची गरज नसते, तर अंतर्गत हायड्रेशनचीही गरज असते. जेणेकरून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

मैत्रीणींनो हिवाळा (Winter 2022) सुरू झालाय. सगळीकडे छान गारठा पसरला आहे. पण तुम्हाला या थंडीचा आनंद घेता येत नाहीय. कारण, तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी पडलीय. बरोबर? पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण, आम्ही तुमच्यासाठी खास टीप्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुमची त्वचा सुरक्षित ठेवू शकाल. (Five Drinks To Stay Hydrated In Winter And Get Glowing Skin)

नियमित पाणी प्या

- Advertisement -

थंड वाऱ्यामुळे त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव बनते. अशावेळी बॉडी लोशन (Body Lotion) आणि कोल्ड क्रीम (Cold Cream) लावूनही त्वचा निर्जीव दिसते. खरं तर, हिवाळ्यात त्वचेला केवळ बाह्य मॉइश्चरायझरची गरज नसते, तर अंतर्गत हायड्रेशनचीही गरज असते. जेणेकरून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. कमी पाणी पिणे हे देखील हिवाळ्यात त्वचा निस्तेज दिसण्याचे एक कारण आहे. हिवाळ्यात तापमान इतके कमी असते की तहान लागत नाही. मात्र बराच वेळ पाणी न पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी नियमित पाणी प्यावे, जेणेकरून तुमची त्वचा ताजीतवानी राहील.

हेही वाचा – थायरॉइड आणि मधुमेहामध्ये ‘या’ पानांचे सेवन करणं आवश्यक

गरमागरम सूप 

- Advertisement -

vegetable soup

हिवाळ्यात आपल्याला काहीतरी तिखट झणझणीत आणि गरम खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही छान गरमा गरम सूप बनवू शकता. सूप प्यायल्याने पोट निरोगी राहते. यासोबतच ते शरीराला हायड्रेट करते. जेवणापूर्वी एक वाटी भाजीचं सूप प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल.

हेही वाचा – तुम्हीसुद्धा पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर करता का? आजच थांबा अन्यथा…

ग्रीन ज्यूस

green juice

फळे आणि भाज्यांपासून तयार केलेले रस तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. हे शरीराला हायड्रेट करते आणि त्वचा उजळते. त्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि सुंदर बनवायचे असेल तर ग्रीन ज्यूस खूप महत्त्वाचा आहे. नियमित ग्रीन ज्युसमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

हेही वाचा पिरियड्समध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदलावे?

लिंबू पाणी

lemon juice

लिंबू पाणी हे सर्वात जलद बनवता येणारं सोपं पेय आहे. लिंबू पाण्यामुळे पचनशक्ती योग्य राहण्यासोबतच त्वचेला फायदा होतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे पेय तुम्हाला हायड्रेट

हर्बर टी

harbal tea

हर्बल टीचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, कॅमोमाइल टी आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. तसेच तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल. तुमच्या गरजेनुसार आणि आरोग्यानुसार वेगवेगळे हर्बल टी पिऊ शकतात.

उदाहरणार्थ, दिवसा ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे, तर कॅमोमाइल चहा रात्री पिणे चांगलं असतं. याशिवाय पेपरमिंट टी, हिबिस्कस टी, जिंजर टी, हे सर्व चहा गरजेनुसार पिऊ शकतात. पण लक्षात ठेवा की कोणताही चहा दोन कपपेक्षा जास्त आरोग्यास हानी पोहोचवू शकतो.

हळदीचे दूध

golden milk

‘गोल्डन मिल्क’ या नावाने जवळपास प्रत्येक घरात प्रसिद्ध असलेले हळदीचे दूध खूप फायदेशीर असतं. दुधात चिमूटभर हळद टाकल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण चांगल्या झोपेसाठीही ते आवश्यक आहे.

लक्षात ठेवा की कोणतेही पेय पाण्याची जागा घेऊ शकत नाही. हिवाळ्यात त्वचा हायड्रेट करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini