Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenRecipe : कैरीची चटपटीत कढी

Recipe : कैरीची चटपटीत कढी

Subscribe

उन्हाळयात आंबे आणि कैरी यापासून अनेक पदार्थ बनवतात. तसेच आंबा आणि कैरी खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून याचे अनेक फायदे आहेत. विशेष करून कैरी खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यासोबत शरीराची पचनक्रिया देखील सुधारते. कैरीची कढी उन्हाळ्यात खासकरून सेवन करावी.

साहित्य : 

 • 1 मोठी कडक कैरी
 • 2 लवंग
 • पाव इंच दालचिनीचा तुकडा
 • 1 चमचा बेसन पीठ
 • 1 चमचा लाल तिखट
 • मीठ,तेल,हळद (प्रमाणानुसार)
 • फोडणीचे साहित्य- मोहरी,जिरं,कडीपत्ता,मिरची
 • 2 चमचा गूळ

 

- Advertisement -

कृती :

Annapurna: Maharashtrian Kadhi Recipe

 • सर्वप्रथम कैरी उकडून घ्यावी आणि कैरीचा गर मिक्सरमधून फिरवून घ्या.
 • यानंतर लाल तिखट,मीठ,पाणी यामध्ये बेसन पीठ चांगलं मिसळून घ्या.
 • हे झाल्यावर कढईत तेल घाला आणि तेल गरम झालं की त्यात लवंग, दालचिनीची पावडर करून घालावी. तसेच हळद घालावी.
 • आता यामध्ये कैरीगराच तयार मिश्रण ओता आणि चवीनुसार मीठ घालावं.
 • त्यानंतर गूळ घालावं आणि हे मिश्रण चांगलं उकळावं.
 • यानंतर तयार कैरीच्या कढीवर छानपैकी बारीक कोथींबीर सर्व्ह करावी.

हेही वाचा :

Recipe : उपवासाचा Yummy बटाटावडा

- Advertisment -

Manini