घरमुंबईLok Sabha : अमित शहांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढतायत; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर...

Lok Sabha : अमित शहांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढतायत; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

अमित शहा यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, अशी मिश्किल टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटली. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अमित शहांच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना हारला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे अमित शहांचा चेलाही संबोधले आहे. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized that Amit Shah is being shamed by his followers Devendra Fadnavis)

भंडाऱ्यातील सभेत बोलताना अमित शहा यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार सातत्याने आरोप करत आहेत की, भाजपाने आमचा पक्ष फोडला. पण मला महाराष्ट्रातील जनतेला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपाने फोडले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले, असे अमित शहा यांनी म्हटले होते. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला अमित शाह यांना सांगायचं आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषकात अंतिम सामना हरला आहे. परंतु मी तसं पुत्रप्रेम कधीच दाखवलं नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : पनवेलमधील वसूली सरकारचा कर आकारणीचा प्रकार आम्ही थांबवू; ठाकरेंकडून आश्वासन

अमित शहांच्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांचं पक्षातील स्थान नक्की काय आहे? भाजपामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शहा जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. अमित शहा सांगतात की, आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आहे. अमित शहा यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, अशी मिश्किल टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

गुंडागर्दी रोखण्याची हिंमत सरकारमध्ये नाही (Government does not guts to stop hooliganism)

दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लोबल त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, सध्या खुलेआम गुंडागर्दी सुरू आहे, कारण राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खुलेआम सुरू असलेली गुंडागर्दी रोखण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा – Lok Sabha : पारंपरिक जागेवर इज्जत राखणे कठीण झाल्यामुळेच…; मोदींनी राहुल गांधींवर साधला निशाणा

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -